Home मराठवाडा मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेमधील गदारोळाला पुर्णविराम, नवीन कार्यकारिणी जाहिर

मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेमधील गदारोळाला पुर्णविराम, नवीन कार्यकारिणी जाहिर

172

 

जालना / लक्ष्मण बिलोरे

मैत्रेय गुंतवणूकदार लोकांना परतावे मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेत फेरबदल करण्यात आला असून संघटनेच्या वतीने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. मध्यंतरी ,गुंतवणूकदारांच्या या संघटनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याने नाशिक येथे १६ फेब्रुवारी रोजी संघटनेची तातडीने बैठक घेण्यात आली होती.या बैठकित संघटनेतील कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात येवून आर्थिक व्यवहाराचा सोक्षमोक्ष करण्यात आला. संघटना कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचे संकेत स्पष्ट झाल्याने काल नवीन संघटना कार्यकारिणी तयार करण्यात आली. संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता कदम यांच्या नेतृत्वाखाली संघटना कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. त्यानूसार संघटनेच्या कार्याध्यक्षपदी रविंद्र वाटेकर,उपाध्यक्षपदी रजनी माळकर,सचिव शारदा शिंदोंडे,खजिनदार हेमलता पाटील तर सदस्य म्हणून सर्वानुमते सर्जेराव जाधव, पुरूषोत्तम गांगुर्डे,कोमल शेरकर,सिमा दरेकर,नाशेर सय्यद, कल्पना महाजन,वैशाली अहिरे,आशा सपकाळ,चंद्रकांत नागपुरे,अनिता पाटील,छाया सरोदे,मंगल तारगे,गणेश घोटेकर,सुमित्रा जाधव,राजेश्वरी पाटील यांची निवड करण्यात आली. संघटना कार्यकारिणीचे गुंतवणूकदारांच्या वतीने स्वागत करण्यात आले.