Home यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी मुख्यमंत्री यांना पाच हजार रूपयांचा धनादेश – विनोद...

जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी मुख्यमंत्री यांना पाच हजार रूपयांचा धनादेश – विनोद पत्रे

67

यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना धनादेश देणार….!

यवतमाळ – दैनिक उद्याचा मराठवाडा या वृत्तपत्रात घाटंजी नगर परिषद ने दिलेली निविदा रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सर्व पुराव्यासह दि. ०४/०३/२०२४ रोजी लेखी पत्र व ईमेल व्दारे पाठवून सुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
तसेच जिल्हातील हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हात कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय होणार हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांन पुढे उपस्थित झाला , येत्या दोन ते तीन दिवसांत घाटंजी नगर परिषद चे प्रभारी मुख्याधिकारी यांची चौकशी करून दैनिक उद्याचा मराठवाडा या वृत्तपत्राचे देयक ( बिल) देण्यात येऊ नये व सदर निविदा जाहिरात स्थानीय वृत्तपत्रांना प्रथम प्राद्यान म्हणून देण्यात यावी.
सदर या प्रकरणात मागील तीन दिवसांपासून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने मा. राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना उच्च प्रतीचे टाळे ( कुलूप) विकत घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाला लावावे जेणे करून कोणालाही न्याय देण्याचे काम होणार नाही , नगर परिषद घाटंजीचे प्रभारी मुख्याधिकारी यांची चौकशी “न” झाल्यास …..या करीता बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी या मल्टिस्टेट शाखेचा धनादेश क्रमांक U -0942174 , मंगलवार दि. १२/०३/२०२४ रोजी सकाळी १२:०० वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला जाणार आहे.