Home सोलापुर शरीर संबधास नकार देणाऱ्या तरुणाचं तरुणीने गुप्तांग कापला ,

शरीर संबधास नकार देणाऱ्या तरुणाचं तरुणीने गुप्तांग कापला ,

83

 

तरुणीला अटक ,

अमीन शाह

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून समोर आली आहे. बार्शीतील स्टॅण्ड समोरील लॉजमध्ये प्रेयसीने आपल्या प्रियकरास जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्तांग चाकूने कापून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २१ रोजी दुपारी २.३० च्या सुमाराला घडली. याबाबत कमलेश काकासाहेब सांगळे (वय २४, रा. शिरूरघाट, ता. केज, जि. बीड) याने शहर पोलिसात प्रेयसी सुरेखा राजेंद्र तांदळे (रा. फक्राबाद, ता. वाशी, जि. धाराशिव) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, कमलेश याचे नंदुरघाट येथे प्रेरणा मोबाईल शॉपी नावाचे दुकान असून या मोबाईल शॉपीवर सुरेखा नेहमी येत जात असल्याने दोघांतील ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. थोड्या दिवसांनी सुरेखा हिने तिचे लग्न झालेले असतानाही कमलेशसोबत लग्न करण्याचा हट्ट करू लागली. परंतु लग्न करण्यास नकार दिल्याने सुरेखा कमलेशला विविध प्रकारे ब्लॅकमेल करु लागली.

लग्न करत नसल्याने तिने चिडून मार्च २०२३ मध्ये कमलेशवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे दोन महिने जेलमध्ये बसावे लागले होते. दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही सुरेखा परत कमलेशला ब्लॅकमेल करू लागली. तरीही लग्न करत नसल्याने तिने कमलेशच्या वडिलावर व भावांवर छेडछाडीचे गुन्हे दाखल केले. तिच्या त्रासाला कंटाळून व नाईलाजाने इच्छा नसतानाही ऑगस्ट २०२३ मध्ये कमलेश व सुरेखा हिने आळंदी पुणे येथे जाऊन विवाह करुन दोघेजण बीड येथे परत आले.
लग्न करुन सुध्दा सुरेखा कमलेशजवळ राहत नसतानाही मोबाईलद्वारे सुरेखा धमक्या देऊ लागली. दि. २१ रोजी पहाटे ५ वाजता कमलेशच्या मोबाईलवर सुरेखाचा फोन आला. तुला बोलायचे आहे, असे म्हणाली असता त्यावर कमलेशने नकार देताच ती धमक्या देऊ लागली. तुझ्या आई वडील, भावावर परत गुन्हे दाखल करीन असे म्हणू लागल्याने तिस आता तुला नेमके काय हवे असे विचारले असता, तिने मला तुला भेटायचे आहे असे म्हणाल्याने मी तिच्या धमक्यांना घाबरून बार्शी येथे असल्याचे सांगितले. तेव्हा तिने कमलेशला दुपारपर्यंत बार्शी येथे येते असे सुरेखा हिने सांगितले. दुपारी २.३० च्या सुमारास सुरेखा बार्शी एस.टी. स्टॅन्ड येथे आली. तेव्हा कमलेश तिला भेटून तुला काय बोलायचे ते येथेच बोल असे म्हणाला. त्यावर तिने मला इथे नाही लॉजवर जाऊन रूममध्ये बोलायचे आहे, असे म्हणाल्याने दोघेही बार्शी एस. टी. स्टॅन्डसमोर असलेल्या साई समर्थ लॉज येथे रूम नं. ३०२ मध्ये गेले. तेथे गेल्यावर सुरेखास आता तरी बोल असे म्हणाल्यावर सुरेखा कमलेशसोबत लगट करु लागली. तिने कमलेश यास बेडवर झोपवले व काढलेला शर्ट अचानक कमलेशच्या चेहऱ्यावर टाकला व काही दिसत नसल्याचा फायदा घेऊन कमलेशच्या गुप्तांगावर मारल्यावर माझा जीव जाईल है माहीत असतानाही धारदार वस्तूने जोरात मारले.
तोंडावरील शर्ट काढून पाहिले असता सुरेखा हिच्या हातात चाकू होता व कमलेश याचे गुप्तांग कापले होते. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे लगेच शर्ट पँट घातले. रक्त पाहून सुरेखाही घाबरली व दोघेही रूममधुन बाहेर येऊन लॉजच्या खाली आलो व दोघेही रिक्षाने जगदाळेमामा हॉस्पिटल बार्शी तेथे मी उपचारास दाखल होताच सुरेखा तेथून कोठेतरी निघून गेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून सुरेखा हिस पोलिसांनी अटक केली असून, दि. २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.