Home बुलडाणा पिंपळगाव सराई ग्राम पंचायत ने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट थांबवावी…

पिंपळगाव सराई ग्राम पंचायत ने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट थांबवावी…

63

पिंपळगाव सराई ग्राम पंचायत चा तुघलकी फर्मान
दर्शनासाठी दरडोई द्यावे लागणार दहा रूपये

धनलोभी लोकांकडून सैलानी बाबा यात्रा कलंकित करण्याचा षडयंत्र.!!

पिंपळगाव सराई ग्राम पंचायत ने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट थांबवावी…

 

मुख्तार शेख , चिखली 

 

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा ही सर्वधर्म समभाव, ऐक्याचा प्रतीक असलेली देशभरात सुप्रसिद्ध आहे.
बुलढाणा हा जिल्हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो , संत श्री गजानन महाराज, संत चोखामेळा, सुफी संत अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या पावन स्पर्शाने जिल्ह्याला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे, श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक शेगांव येथे येतात, शेगांव येथे महाराजांच्या प्रगटदिनी लाखोंच्या संखेने भाविक भक्त पायी दिंडी ने किंवा वाहनाने येतात.
गजानन महाराज यांच्या श्रद्धेपोटी येणाऱ्या भाविकांचा आदर करीत प्रत्येक दिंडीचे व दर्शनाला जाणाऱ्या भक्तांचे शेगांव सह रस्त्यावरील प्रत्येक गावात चहा, नाश्ता पाणी, जेवणाची व्यवस्था विनाशुल्क केल्या जाते.
लाखोंच्या संख्येने भाविक शेगांव येथे येतात त्यांच्या येण्याचे स्थानिक स्वराज्य संस्था ही मनाने स्वागत करते. भाविकांसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध असल्याने
आज शेगांव संस्थान हे प्रत्येकाच्या आस्थेचे ठिकाण बनले आहे.
संतांची भूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आस्था व श्रद्धेला पिंपळगाव सराई ग्राम पंचायत कडून कलंकित केल्या जात आहे ज्यामुळे भाविकांच्या मनात नाराजगी वाढली आहे.
सविस्तर वृत्त असे की सैलानी हे पिंपळगाव ग्राम पंचायत अंतर्गत येणारी छोटीशी वस्ती जिथे कोणत्याच मूलभूत सुविधा नसतांनाही आज देशभरात सैलानी हे गाव सुप्रसिद्ध झाले त्याला कारण सैलानी येथील सुफी संत अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांची सर्वधर्मीय आस्था असलेली दर्गा मुळेच.
एरव्ही वर्षभर नल , जल, पथदिवे सारख्या सुविधा पासून दुर्लक्षित असलेली ही छोटीशी वस्ती होळी व संदल सारख्या द्विगुणित आनंदाच्या क्षणी गजबजून जाते.
देशभरातून लाखो भाविक होळी पेटविण्यासाठी व बाबांच्या संदल साठी येतात ज्यामुळे परिसरातील व दूर राज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांना पण त्याचा फायदा होतो.
कोणत्याच मूलभूत सुविधा नसतांनाही ग्रामपंचायत व्यापाऱ्यांकडून कर वसुली केल्या जाते त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही.
परंतू पिंपळगाव सराई ग्राम पंचायत चा पैश्याचा हव्यास वाढल्याने आता तुघलकी फर्मान काढून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरडोई प्रत्येकी दहा रूपये सक्तीने द्यावे लागेल असा ठराव काढला व चौकाचौकात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांकडून प्रत्येकी दहा रूपये वसूली करण्यात येत आहे.
ज्या यात्रेत प्रवेशद्वारावरच आर्थिक लूट होत असेल तर यात्रेत वरली, मटका, ऑनलाईन चकरी, दारू, गांजा सारखे धंदे बिनधास्त चालणारच यात शंका नाही. भविष्यात पण अशीच लूट होत राहिली तर महाराष्ट्राच्या पाठीवर सर्वधर्मीय आस्थेचे एकमेव यात्रा नष्ट होईल यांची चिंता सतावत आहे.

मुख्तार शेख
7057911311