Home यवतमाळ महायुतीचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे राजू उंबरकर यांच्या भेटीने राजकीय...

महायुतीचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे राजू उंबरकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

84

मनसेच्या भूमिके कडे लागले सर्वांचे लक्ष .

वणी/प्रतिनिधी

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या भेटीचं सत्र सुरू आहे. यातच आता चंद्रपूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काल मनसेचे नेते राजू उंबरकर यांची निवासस्थानी अचानक भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गत निवडणुकीत मनसेने आपली साथ बाळु धानोरकराना दिल्या नंतर काँग्रेसचा विजय निश्चित झाला होता. आता या निवडणुकीत मनसेची काय भूमिका असेल त्यावर राजकीय समीकरण बदलणार आहे.

राज्यात २ टप्प्यात लोकसभा निवडणुकी पार पडणार असून पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणुका पार पडणार. निवडणुकांची रणधुमाळी जोरात चालू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट न केल्याने मनसे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींची भेटीसाठी घेतल्या नंतर या निवडणुकीत मनसेचे इंजीन कमळाशी जोडली जाईल. ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री तथा चंद्रपूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेचे विदर्भातील बडे नेते राजु उंबरकर यांची काल वणीतील मनसे कार्यालयात भेट घेतल्याने चंद्रपूर लोकसभेत नव्या समीकरणाची जुळवा जुळवा चालू. चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रात मनसेचे दमदार प्राबल्य आहे. गेल्या अनेक निवडणुकांमधून मनसेची वोट बँक दिसून आली. गेल्या निवडणुकीमध्ये मनसेने आपली साथ काँग्रेसच्या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना दिल्यानंतर धानोरकरांचे विजय निश्चित ठरला होता. आता या निवडणुकीत मनसे भाजपच्या दिमतीला असल्यास या क्षेत्रात महायुतीला मनसेचा मोठा फायदा होऊ शकतो.
या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. अशातच चंद्रपूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या निवासस्थानी दि. ३ एप्रिल रोजी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या भेटीदरम्यान उंबरकर परिवाराकडून मुंगटीवार यांचे आदरतिथ्य करत सौ. तृप्ती राजु उंबरकर यांनी औक्षण केलें तर मनसेच्या वतीने मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती न देण्यात आल्याने नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होती याबाबत अजून सुस्पष्टता नसून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक चर्चा सुरू असून वणी मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.