Home यवतमाळ चंद्रपुर – आर्णी लोकसभा क्षेत्रात प्रतिभा ताईची भरारी..

चंद्रपुर – आर्णी लोकसभा क्षेत्रात प्रतिभा ताईची भरारी..

66

घाटंजी – अती महत्वाची समजल्या जाणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक येत्या १९ एप्रिल ला होत असून पाण्यासारखा पैसा वाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या घाटंजी तालुक्यातील दोन गटाच्या वादात कार्यकर्ता चांगलेच संतापले असुन आपल्या ताईच बऱ्या म्हणत राष्ट्रीय काँगेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांना पसंती देत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे घाटंजीत दोन गट असल्याचे सर्वांना माहीत आहे.याठिकाणी कोणताही दुरावा निर्माण होवू नये म्हणून दोन कार्यालय थाटण्यात आले यात मोठा घोळ असल्याचे बोलल्या जात असून कोणालाही नको असलेला राजकिय अनुभव नसलेले व जनतेच्या अडचणी समजून न घेणारे सेवानिवृत्त शिक्षक यांना तालुका अध्यक्ष पदी बसविल्याने निष्ठावंत जाम नाराज असून त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातून कसे भाजपला कमी मते पडतील अश्या प्रयत्नात दिसत आहे. यापूर्वी घाटंजी व आर्णी तालुक्यातून भारतीय जनता पक्षाचे हंसराज अहिर यांना लीड होते मात्र यावेळेस येथिल तालुका अध्यक्ष यांच्या शिष्टाइने नक्कीच काँग्रेस चे उमेदवार बाजी मारणार हे निश्चित वाटत आहे. केळापूर – आर्णी विधान सभा क्षेत्र मोघे परीवांरकडे असले तरी त्यांच्या कार्यावर सुद्धा नागरिक नाराज आहे. मात्र कर्त्यव्यदक्ष तालुका अध्यक्ष रुपेशरेड्डी कल्यमवार यांच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते स्वयंम स्पूर्तीने कार्य करतांना दिसत आहे. त्याच सोबत नुकतेच माळी मिशन चे पांडुरंग निकोडे, दिनेश गाऊत्रे, व बंजारा समाजातील बहुतांशी पुढाऱ्यांनी पाठिंबा जाहिर केल्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांचे सप्न टोपल्यात दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते केवळ जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी शहरातील एका पेट्रोल पंपावर दिवसभर ताटकळत असताना सर्वच्या निदर्शनात येत असून त्यांचे कडे पाहून सर्वसामान्यांना कदर येतं असल्याचे बोलल्या जात आहे. भारतीय काँगेस पक्षाच्या महिला उमेदवार असल्याने कोणीही पैद्याची अपेक्षा न करता तन मन धनाने कार्य करतांना दिसत आहे. मनमिळावू स्वभाव असलेले घाटंजी तालुका अध्यक्ष रुपेश कल्ल्यमवार हे काँगेस साठी उपउक्त ठरत आहे. सोबतच माझी आमदार राजू तोडसाम हे मतदार संघात उपउक्त असून त्यांची मोठी फळी आहे. नुकतेच त्यांनी काँगेस उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांना पाठिंबा जाहिर केल्याने त्यांचा मोठा फायदा होणार असणार असल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती निधी प्राप्त करता येईल या विचाराने प्रचारात असल्याने त्यांचा विजय कोसो दूर पोहचला असल्याचे पहावयास मिळत आहे.