यवतमाळ / घाटंजी – माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार जिजाऊ आश्रम शाळा खापरी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा खापरी येथील रेकॉर्डमध्ये अनेक गैरप्रकार आढळून आले. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी एकाच दिवशी दोन्ही शाळेत हजर दाखविण्यात आले. जिजाऊ आश्रम शाळेच्या हजेरीपटावर कुठे दोन बहीण भावंडांच्या जन्मातील फरक हा ९ महिन्यांचा, कुठे ८ महिन्यांचा, कुठे ३ महिन्यांचा, तर कुठे फक्त ५३ दिवसांचा दाखविण्यात आला होता.
याप्रकरणी अक्षय पाटील विरदंडे यांनी फौजदारी प्रक्रिया सहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत, ऍड जि आय धात्रक यांचे मार्फत घाटंजी न्यायालयात याचिका दाखल केल्यावरून जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक, आश्रम शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक, विद्यमान मुख्याध्यापिका व बोगस हजेरीपट तयार करणारी शिक्षिका कू. एस जी चौधरी यांचे विरोधात घाटंजी पोलीस स्टेशन ला, गुन्हा क्रमांक ८१७ नुसार, भा. दं. वि. चे कलम ४१७, ४२०, ४६७, ४६८, ४७० व ३४ अन्वये गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासा दरम्यान येथील मुख्याध्यापिका यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.. दाखल झालेल्या सदर गुन्ह्यांच्या तपासाअंती घाटंजी न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे…
या दोषारोपपत्रात वादग्रस्त नावे असलेल्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची बयाने तपासल्या नंतर आश्चर्यकारक बाबी समोर आलेल्या आहेत…. अनेक विद्यार्थ्यांचे तथा काही पालकांचे बयानवरून असे कळते की, जिजाऊ आश्रम शाळेत कधी प्रवेश पण न घेतलेले विद्यार्थी सुद्धा चौधरी मॅडम यांचे वर्गात हजर दाखविण्यात आले होते… मात्र घाटंजी पोलिसांचा तपास अहवाल हा बहिण-भावंडं असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जन्मातील अनैसर्गिक फरकाबाबत अनुत्तरित आहे…
विद्यार्थ्यांचे व पालकांचे बयान नोंदविल्यानंतर सुद्धा येथील त्या कर्मचाऱ्याने पुन्हा एकदा “देख लेंगे कुछ नहीं होता” म्हणत कुठला तरी स्टॅम्प घोटाळा केल्याची सुद्धा आतल्या गटात चर्चा आहे..
सदर प्रकरणी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची खात्री असल्याने, घाटंजी पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या चर्जिशिट वर आक्षेप घेऊन पिटीशनर अक्षय पाटील विरदंडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास राज्याच्या सीआयडी कडे देण्याच्या मागणीकरिता नागपूर येथील ऍड. यशराज आर. किनखेडे यांचे मार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती… अक्षय विरदंडे -विरुद्ध- महाराष्ट्र शासन (Cri Rit Petition 197/2023) या याचिकेत शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल रोजी नोटीस जारी करण्यात आलेली आहे…
प्रकरणी झालेला संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढून दोषींवर प्रशासकिय तथा फौजदारी कारवाई करण्यासाठी अखेरपर्यंत लढा देणार असल्याचे यावेळी अक्षय पाटील विरदंडे यांनी सांगितले आहे..
प्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे शिक्षण क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.