शांतीलाल मुथा यांच्याहस्ते सत्कार
रावेर (शरीफ शेख)
जळगाव , दि. ०६ :- जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर येथील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांचा जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे झालेल्या मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात उत्कृष्ठ विडिओ निर्मितीनिमित्त एसएमएफ फाउंडेशनचे अध्यक्ष शांतीलाल मुथा,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव च्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शांतीलाल मुथा फाउंडेशन,पुणे व राज्य शासनाचा शिक्षण विभाग यांच्याद्वारे राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविला जात आहे.मूल्यवर्धन उपक्रमात कार्य करणारे प्रेरक,शिक्षक,केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांचा जिल्हा मेळावा छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह,जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव चे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे,जिल्हा परिषद सीईओ डॉ.बी.एन.पाटील,जळगाव च्या महापौर भारतीताई सोनवणे,डायट प्राचार्या मंजुषा क्षीरसागर,उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग,दलुभाऊ जैन, जळगाव जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.मूल्यवर्धन उपक्रमाचे स्वअनुभव,परिणाम यावर जिल्हाभरातून शिक्षकांनी 500 च्या वर विडिओ तयार केले होते त्या विडिओतुन उत्कृष्ट असे १८ विडिओ निवडण्यात आले त्यात शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांचा “मूल्यवर्धन उपक्रम माझे मत” हा विडिओ निवडण्यात आला व जिल्हा मूल्यवर्धन मेळाव्यात गौरव करण्यात आला.संदिप पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी,केंद्रप्रमुख,शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.