अमीन शाह ,
बुलडाणा ,
गेल्या दोन दिवसा पासून काही वृत्त पत्रात खताची दरवाढ बळीराजा संकटात अश्या बातम्या येत होत्या मात्र त्या बातम्या चुकीच्या असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले आहे जर कोणी कृषी केंद्र चालक जर जास्त भावाने खत विक्री करत असेल तर त्याची रीतसर तक्रार आमच्या कडे दाखल करावी उलट गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी खताचे दर कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत ,
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया ने वास्तव तपासल्यानंतर खताचे दरच वाढले नसल्याचे समोर आले आहे नवीन आलेल्या खतांवर जुनेच दर असल्याचे दिसून आले आहे ,
———————————————-
दरवाढीचे कुठलेही पत्र आलेले नाही
खतांच्या दरवाढीच्या संदर्भात आलेल्या बातम्या आम्ही देखील पाहिल्या परंतु या दरवाढी संदर्भात शासनाकडून अधिकृत पत्र आम्हाला मिळालेले नाही. त्यामुळे आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवता येणार नाही. सिंदखेडराजा तालुक्यात खताचा लॉट आलेला आहे. त्यामध्ये खताच्या थैलीवर जुनेच दर आहेत. सोशल मीडियावर फेक न्यूज फिरत असल्यामुळे अशा बातम्या वेगाने पसरत आहे कदाचित . परंतु सध्या खतांच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. जर कोणी कृषी केंद्र चालक खताची जास्त भावाने विक्री करत असेल तर त्याची रीतसर तक्रार कृषी विभागा कडे करावी आम्ही कार्यवाही करू ,
मनोज ढगे ,
जिल्हा कृषी अधिकारी ,बुलडाणा
कृषी केंद्र चालकात संभ्रम अवस्था ,
खताच्या दरा बाबत काही कृषि केंद्र चालकात संभ्रम अवस्था दिसून आली तर काही कृषी केंद्र चालकांनी खत विक्री बंद करून भाव वाढीचा फायदा घेण्यासाठी गोडाऊन कुलूप बंद केले असल्याचे दिसून आले कृषी विभागाने खत विक्री बाबत कृषी केंद्र चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे ,