Home यवतमाळ बोदडी येथे इसमावर कुऱ्हाडीने वार..

बोदडी येथे इसमावर कुऱ्हाडीने वार..

26

मारेकऱ्यांनीही विषारी औषध प्राशन केल्याची माहिती.

राजु चव्हाण

घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोदडी येथे गुरुवारच्या पहाटे तीन वाजेदरम्यान जयसिंग जाधव वय ५५ वर्ष याच्या गळ्यावर व मानगुटीवर कुऱ्हाडीचे तीन घाव घालून आरोपी राजेश अडसपुरे यांनी गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला असून त्यानेही विषारी औषध प्राशन केल्याचे समजते.
संपूर्ण गावात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या बोदडी गावात गुरुवारच्या पहाटे तीन वाजेदरम्यान अंगणात झोपून असलेल्या जयसिंग जाधव याचेवर आरोपी राजेश अडसपुरे यांनी कुऱ्हाडीने तीन वार केले.यात ते गंभीर जखमी झाले ही बाब लक्षात येताच त्याला प्रथम घाटंजी येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दुखापत जास्त असल्याने त्याला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात हलविल्याचे समजते. याबाबीची तक्रार जखमी यांची पत्नी सावित्रा जयसिंग जाधव यांनी पारवा पोलीस स्टेशन ला दिली यावरून पारवा पोलिसात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारेकऱ्यांनी सुद्धा विषारी औषध प्राशन केल्याचे समजते त्यांना प्रथम घाटंजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व नंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असल्याचे समजते.घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप नरसाळे यांनी घटना स्थळाला भेट देवून पुढील तपास सुरू केला आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला हे अजून समजू शकले नाही.