मेळघाटातील घटना, वृद्ध आरोपीला अटक
अमीन शाह ,
चिखलदरा : पती-पत्नी जेवण करीत
असताना वृद्धेने नवऱ्याच्या ताटात कमी खिचडी वाढल्याच्या रागावरून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यानंतर काठीने कानाखाली मर्मातक प्रहार करण्यात आला. या घटनाक्रमात ती वृद्धा मरण पावली. हत्येची ही घटना तालुक्यातील डोमा येथे उघडकीस आली. या प्रकरणात ७० वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे
पोलिस सूत्रांनुसार, लुकाय भाकलू सावलकर (६५) असे मृताचे नाव आहे. भाकलू हिरालाल सावलकर (७०, दोघेही रा. डोमा) आरोपीचे नाव आहे. नातू अल्केश भोगीलाल मावस्कर (२७) याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून भाकूला अटक केली. अल्केशच्या फिर्यादीनुसार, तो व त्याची पत्नी शेतातून घरी सायंकाळी ६ च्या सुमारास परतले तेव्हा आजी लुकाय
क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीत पत्नी लुकायचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पती भाकलू घरातच बसून राहिला. तेथूनच पोलिसांनी त्याला अटक केली आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. त्याबाबत आजोबा भाकलू याच्याकडे विचारणा केली असता, ताटामध्ये खिचडी कमी टाकल्याच्या कारणाने वाद झाला, त्यात थापडबुक्क्यांनी मारहाण करून काठीने तोंडावर तसेच डावे कानाखाली व जबड्यावर प्रहार केल्याने लुकाय ही बेशुद्ध होऊन कोसळली व मरण पावली, असे भाकलूने सांगितले.
यानंतर अल्केशने काटकुंभ पोलिस चौकीत तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.