गिरीश भोपी
अलिबाग , दि. ०६ :- एस.एन.डी.टी. कला आणि एस.सी.बी. वाणिज्य विज्ञान महिला महाविद्यालय, मुंबई तर्फे महाराष्ट्प राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या सहयोगाने ‘महिला उद्योजिकांसाठी डिजिटल साक्षरता : निवास व न्याहारी उद्योजिका’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार, २९ जानेवारी रोजी वरसोली येथील पर्णकुटी कॉटेज येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे या कार्यशाळेचे संयोजन प्रा. चित्रा लेले, डॉ. किशोर कदम यांनी केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे आनंद निवेकर यांनी केले. तर समारंभाच्या अध्यक्ष म्हणून वंदना शर्मा, पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रीदा रशीद, महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रशिक्षक रुपाली कापसे, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष निमिष परब, नागाव पर्यटन सेवा संस्थेचे अध्यक्ष सौरभ आपटे, साईश्रद्धा फाऊंडेशनचे, साईश कॉलेजचे अध्यक्ष विजय राणे, वरसोलीचे माजी सरपंच मिलिंद कवळे, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगडचे संचालक विजयकुमार कुळकर्णी आणि साहित्यिक-संपादक उमाजी केळुसकर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रशिक्षक रुपाली कापसे यांनी उपस्थित महिलांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे महत्व विषद केले. त्यानंतरच्या कार्यशाळेत त्यांनी भ्रमण ध्वनी साक्षरता आणि इंटरनेट वायफायचा वापर, आर्थिक व्यवहारासाठीचे ऍप्स आणि ई देयके व त्याचे फायदे, जीवन कौशल्य प्रशिक्षण- ई बाजार आणि ई शिक्षण या बाबतचे मार्गदर्शन केले.
शेवटी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य रीदा रशीद यांनी उपस्थित महिला उद्योजिकांना मार्गदर्शन केले आणि त्याच्याच हस्ते कार्यशाळेत सहभागी शालेल्या उद्योजिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेने विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेत निवास व न्याहरी संबधी कार्यरत असणार्या कॉटेजेस, हॉटेल्स, रिसॉर्टसमधील ५० महिला उद्योजिकांनी सहभाग घेतला.