Home अकोला जन्मदात्या बापाच्या अंगावर गरम तेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीस दोन...

जन्मदात्या बापाच्या अंगावर गरम तेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीस दोन वर्षे कारावासाची शिक्षा ,

69

 

अमीन शाह

संपत्तीच्या हव्यासापोटी जन्मदात्याच्याच जीवावर उठलेल्या मुलीने बाप आणि बेटीच्या पवित्र नात्याला कलंकीत करून काळीमा फासल्याची घटना घडली होती
वडील झोपलेले असताना त्यांच्या अंगावर गरम तेल ओतून मुलीने त्यांना जखमी केले होते. ही घटना 2022 मध्ये घडली होती. आज या प्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलीस भादंवि कलम 324 अंतर्गत दोषी ठरवुन 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून वृध्द बापास न्याय मिळवून दिला.

सत्र न्यायाधीश क्रमांक 2 शयना पाटील यांनी 16 मे रोजी आरोपी प्रतिभा ( वय 40 वर्षे, रा. मानकी, ता. बाळापुर, जि. अकोला) हिला भा.दं.वि. कलम 324 अंतर्गत दोषी ठरवुन 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

घटनेची हकीकत अशी की, आरोपी महिला ही लग्न झाल्यावर तिचे पती सोबत पटत नसल्यामुळे वडील महादेव सिताराम सोनोने यांचे सोबतच राहत होती. आरोपी तीचे वडीलांसोबत घर बांधण्याचे कारणावरुन वाद होते. 22 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने तीचे वडील झोपलेले असताना पातेल्याने त्यांचे अंगावर सोयाबीनचे गरम तेल ओतले. ज्यामुळे फिर्यादीस गंभीर जळाल्याच्या जखमा झाल्या. घटनेनंतर आरोपी मुलीला तेथून पळुन जात असतांना वडीलांनी पाहिले. त्यानंतर लोकांनी जखमी महादेव सोनोने यांना उपचारार्थ रुग्णालय भरती केले.त्या नंतर जखमीच्या दवाखान्यात नोंदविलेल्या बयाणा वरुन आरोपी मुली विरुध्द बाळापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पी.एस.आय. भाष्कर तायडे यांनी करुन दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणा मध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता फिर्यादी महादेव सोनोने यांचे सह एकुण 05 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपी महिलेस भा.द.वि. कलम 324 अंतर्गत दोषी ठरवुन 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.