Home बुलडाणा एसटी बस मध्ये प्रवाशाच्या पर्स मधून अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबवीनार्‍या चार...

एसटी बस मध्ये प्रवाशाच्या पर्स मधून अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबवीनार्‍या चार महीलाना हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे अटक

32

 

गुलशेर शेख

दुसरबीड…… (बुलडाणा )आज सकाळी दुसर बीड येथील अमृता हॉटेलवर पुणे ते कारंजा महामंडळाची बस प्रवाशांच्या चहा व नाश्ता करिता थांबली असता चार महिला ज्यांच्याजवळ लहान मुले होती अशा महिला गाडी हॉटेलवर थांबली असता गाडीमधून उतरून ये का ऑटो रिक्षात बसून जाताना हॉटेल मालकाच्या लक्षात आले व हा प्रकार काय याबाबत संशय आल्यामुळे सर्व प्रवाशांना याबाबत सूचना देऊन आपले साहित्य तपासण्यास सांगितले असता त्यामधील एका प्रवासी महिलेच्या पर्स मधून ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे गंठण या महिलांनी परस्पर चोरून नेल्याची लक्षात आली स्थानिक अमृता हॉटेल चे मालक अमोल भोसले व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आपल्या दुचाकी वाहनावर सदर प्रवासी महिलेस घेऊन ज्या रिक्षामध्ये महिला गेल्या होत्या त्या रिक्षाचा पाठलाग केला व दुसरबीड गावाची जवळ असलेल्या मजीत जवळ रिक्षा अडवून त्यामध्ये असलेल्या चार महिला यांची ओळख प्रवासी महिलेस सांगितले व त्याबाबत त्यांना चोरी केलेल्या सोन्याच्या गंठणबाबत त्यांची तपासणी केली असता प्रवासी महिलेचे चोरलेले सोन्याचे गंठण काढून दिले या प्रकाराबाबत किनगाव राजा पोलीस स्टेशनला माहिती देऊन सदर महिलांना त्यांचे स्वाधीन करण्यात आले हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे व गावातील युवकांनी केलेल्या सहकार्यामुळे प्रवासी महिलेचे चोरीस केलेले गंठण परत मिळाले सदर प्रकरणाबाबत किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री विनोद नरवाडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित महिला कडे कोणत्याही प्रकारचा कागदोपत्री पुरावा नसल्याची आढळून आले त्यांच्या नावाबाबत अनिश्चितता असल्यामुळे चारही महिलांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलावर लोणार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे एचडीएम साहेबांच्या मार्फत त्यांना लोणार पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली सदर महिला विरोधात किनगाव राजा पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल श्री मुंडे यांनी फिर्यादी यावरून किनगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे