Home परभणी 50 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरिक्षका सह दोघे अटकेत

50 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरिक्षका सह दोघे अटकेत

57

 

मानवत येथे अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

 

शमशेर खान पठाण

परभणी/जिल्हा विशेष प्रतिनिधी

रेतीची अवैध वाहतूक करताना पकडलेला ट्रक सोडविण्यासाठी लाचेची मागणी करून 50 हजार रूपये स्विकारल्याप्रकरणी मानवतचे पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे व अन्य एकास ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणात आरोपी गजानन रामभाऊ जंत्रे (वय 54 वर्षे, पद – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (वर्ग 3), नेमणूक पो.स्टे.मानवत जि.परभणी रा.राजर्षी शाहू महाराज नगर, मानवत), मुंतसिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बुभाई (व्यवसाय खाजगी नौकरी, रा.खडकपुरा कुरेशी गल्ली, मानवत) यांंच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोउपनि जंत्रे यांनी तक्रारदाराचा रेतीचा ट्रक व ट्रक चालकास रेतीची वाहतूक करताना पकडले होते. त्यावरून मानवत पोलीस ठाण्यात कलम 379,34 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील जप्त ट्रक सोडविण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्याकरिता जंत्रे यांनी तक्रारदाराकडे 1 लाख रूपये मागितले. ही रक्कम लाच असून ती देण्याची इच्छा नसल्याने दि.19 मे रोजी रोजी त्यांनी एसीबी परभणी येथे तक्रार दिली होती.