मजहर शेख
किनवट / नांदेड , दि. ०६ :- आपल्या अंगी दडलेल्या विविध छ्दांच्या कलाविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सृर्जनशिलतेला फुलण्याची संधी मिळते. त्यातूनच उद्याचा सशक्त कलावंत निर्माण होतो. असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने यांनी केले.
तालुक्यातील दहेलीतांडा आश्रमशाळेतील भव्य मंचावर श्री धावजी नाईक प्राथमिक व स्व. संगीतादेवी माध्यमिक आश्रमशाळा दहेलीतांडा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलना निमित्य आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव रमेश चंपतराव जाधव होते; तर सरपंच राजेंद्र तोडसाम, प्रतिष्ठीत नागरिक रमेश राठोड, राजेश जाधव, विनोद राठोड, डोळस, ब्रम्हसिंग राठोड, धरमसिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात लोकगीत, व्यसनमुक्ती जनजागृतीपर नाटिका, संस्कृती दर्शक नृत्य, वक्तृत्व आणि इतर कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरणासह आदिवासी, बंजारा लोकनृत्यांची धमाल करण्यात आली.
स्व. संगीतादेवी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ई.एस.बैनवाड यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्मणकर, पवार व अमोल यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री धावजी नाईक प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम गबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन राठोड, राऊत, कोठावदे,संजय पवार, विठ्ठल राठोड, शेख सर्वर, गणेश कमठेवाड आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.