सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. ०६ :- जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजा जखाळा शिवारात बुधवारी रात्री शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन वासराचा बळी बीब ट वाघाने घेतला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जखाळा शिवारात सुरेश रामदास माहूरे यांचे शेत आहे या शेतातच रस्त्यालगत असलेल्या गोठ्यात गुरे बांधल्या जातात पण गुरुवारी सकाळी शेतात गेल्यानंतर पाहता एक कालवड जागीच ठार झाले ले दिसले व एक कालवड गोठ्यात आढलून आले नाही पण काही दूर अंतरावर रक्त आढळून आल्याने ती कालवड दूरवर नेली असावी असा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काढला या शिवारात असा प्रकार कधीच घडला नाही त्या मुळे बिबट वाघ येथे आल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे अडीच एकर शेती व गो पालन यावर कुटुंबाची भिस्त आहे अंदाज 15 हजार रु चे नुकसान झाले ते वन विभाग देणार काय या कडे लक्ष लागले आहे.