Home यवतमाळ विज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन…!

विज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन…!

34

यवतमाळ – यवतमाळकर वीज जन आक्रोश संघर्ष समितीच्या* वतीने महावितरणचे उपविभागीय अभियंता श्री राऊत यांना महावितरण कार्यालय यवतमाळ येथे विनंती वजा इशाऱ्यातून निवेदन देण्यात आले.

सदोष अशा तांत्रिक बाबी, कर्मचाऱ्यांची कमतरता, अस्थायी स्वरूपाचे अधिकारी असल्यामुळे नागरिकांना सतत व अखंड वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक वर्गातील, जसे छोटे-मोठे दुकानदार, लहान मुले, ज्येष्ठ, महिला वर्गांना या खंडित वीजपुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नेमके लाईट गेल्यानंतर चोर संधी साधून चोरीचे प्रमाण वाढले आहे. 42 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये रात्री बे रात्री जाणाऱ्या विजे मुळे लहान मुले व वृद्ध उष्माघाताने आजारी पडत आहेत. उपविभागीय अभियंता श्री राऊत यांनी येत्या शनिवार रविवार व सोमवार या तीन दिवसात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदनकर्त्यांच्या वतीने पुन्हा मंगळवार सुद्धा त्यांना दिला असून, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास येत्या बुधवारी वीज ग्राहक यवतमाळकर नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारून कॅण्डल मोर्चाचे आयोजन करतील. असे सांगण्यात आले. निवेदन देताना *यवतमाळकर वीज जन आक्रोश संघर्ष समितीचे* संयोजक प्रलय टिप्रमवार, अनिल हमदापुरे, राजेंद्र गावंडे, राजू टेकाडे, ललित गजभिये, विनोद दोंदल, महादेव काचोरे, सुनील संकोचवार व इतरही यवतमाळकर नागरिकमोठ्या संख्येने उपस्थित होते.