Home अकोला 75 वर्षीय वयोवृद्ध म्हतारी वर बलात्कार करणाऱ्या तरुणास बुलडाणा जिल्ह्यातून अटक ,

75 वर्षीय वयोवृद्ध म्हतारी वर बलात्कार करणाऱ्या तरुणास बुलडाणा जिल्ह्यातून अटक ,

69

 

अमीन शाह

अकोला: दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर अत्याचार करणा-या फरार आरोपीस बोरगाव मंजु पोलीसांनी आज घेतले ताब्यात असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राहूल अर्जुन मोरे (वय 24 वर्ष रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा) असे या विकृत नराधमाचे नाव आहे.

पोलीस स्टेशन बोरगाव मंजु हददीतील ग्राम दाळंबी (ता. जि. अकोला) येथे राहणा-या एका वयोवृध्द महिला 28.05.2024 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास अकोला येथून निघून एस टी बसने ग्राम कोळंबी फाट्यावर उतरली. तेथून प्रायव्हेट लक्झरी बसने तिचे गावी दाळंबी येथे जाण्यास निघाली. दाळंबी गावाचे पुलाच्या अलीकडे ही महिला उतरली. तेथून ती पायी जात असतांना थोडे दूर अंतरावर गेली असता, तिचे समोरून रस्त्याने दोन मोटर सायकलवर तिघे इसम आले. एका मोटर सायकलवरील दोन इसमांनी त्यांचे तोंडाला रूमाल बांधुन व एका मोटर सायकलवरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी म्हातारीला उचलून रोडचे बाजुचे लिंबाच्या मळयामध्ये नेले. तोंडाला बांधलेले दोन इसम तेथून निघून गेले. त्या ठिकाणी हजर असलेल्या तिस-या इसमाने म्हातारीचे तोंड दाबून तिला विवस्त्र केले. तिचे सोबत जबरीने संबंध केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास तर मारून टाकणार, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही. यानंतर आरोपी महिलेस मारण्याच्या उद्देशाने दगड शोधत होता . मात्र समय सूचकता बाळगत महिला तेथून तिचे कपडे घेवून पळून गेली, ती पळून जात असतांना तिला तिचे गावातील धर्मा शिंदे व त्याचे सोबत एक इसम दाळंबी गावाकडे पायी जात असतांना दिसले. तेव्हा महिलेने धर्मा शिंदे व त्याचे सोबत असलेल्या इसमास तिचे सोबत गैरकृत्य करणा-या इममास पकडा असे म्हटले असता, त्यांनी त्या इसमाचा पाठलाग केला असता तो तेथून मोटर सायकल घेवून पळून गेला. यानंतर गावातील दोघांनी पीडित महिलेला तिचे घरी नेवून सोडले.
या घटने नंतर महिलेने मोठे धाडस दाखवून स्वतः पोलीस स्टेशनला येवून पोलीसांना आपबिती सांगितली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांनी अप. नं. 281/2024 कलम 376, 376 (डी), 506, 34 भादंवि प्रमाणे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करुन तपासात घेतला होता.
गुन्हा हा वयोवृध्द महीलेच्या संदर्भातील व आरोपी अज्ञात असल्या कारणाने त्याचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजुचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांचे वेगवेगळे पथक करून रोज मार्गदर्शन घटनेपासून करीत होते. तसेच पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देवून तांत्रिक विश्लेषणात स्वतः मार्गदर्शन केले. वेगवेगळे पथक सी सी टी व्ही फुटेज व ईतर तांत्रिक बाबींवर तपास करीत असतांना गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन निष्पन्न करून, आरोपी राहूल अर्जुन मोरे (वय 24 वर्ष रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा) यास ताब्यात घेतले. आरोपीस गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबूली दिली. त्याने एकट्याने गुन्हा केल्याचीही कबूली दिली असून सोबत कोणीही नसल्याचे सांगितले व तसे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बांग्गाव मंजु पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, एएसआय अरूण गोपनारायण, पोहवा योगेश काटकर, गिरीष विर, नारायण शिंदे, पोलीस कॉन्टंबल सचिन सोनटक्के, नितीन पाटील, सुदीप राउत, संदीप पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अविनाश पाचपोर, रवि खंडारे, अब्दूल माजिद, वसीम शेख तसेच सायबर सेलचे प्रशांत केदारे व गोपाल ठोंबरे व चालक एएसआय गोविंदा कूळकर्णी यांनी केली आहे.