मुम्बई – (प्रतिनिधी) विहार सरोवर ही मुंबई ची प्राण वाहिनी आहे, लाखो लोक या सर्वराचे पाणी पिवून तहान भागवतात, सदर परिसरात अवैध्य बांधकामे झालेली आहेत तर आता नव्याने बांधकामे होत आहेत, यासाठी साडेतीन कोटी मुंबई करांच्या जीवनाशी या धन दांडग्यांना खेळू देणार नाही, प्रसंगी जीव गेला तरी बेहत्तर पण निसर्गाचा ह्रास होवू देणार नाही अशी भिम्प्रतिज्ञा देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियानचे राष्ट्रीय आयोजक पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.*
शासन आणि प्रशसानाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीची माहिती दाखवून परवानग्या घेवून विहार सरोवर शेजारी खोडकाम करून बांधकाम करण्याचा प्रयत्न विकासक प्रशांत शर्मा यांच्याकडून केला जात आहे. असे समजते की, यांच्या या अनधिकृत कामाला सत्ताधारी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधी पाकिटे देवून घेवून त्यांना प्रशासनिक मदत करत आहे. लवकरच त्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा चेहरा समजापुढे आणू असाही विश्वास विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांना व्यक्त केला.
ब्रिटिश कालीन विहार सरोवर या ठिकाणी तत्कालीन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधण्यात आला होता. मात्र: काही धनदांडगी स्वार्थी प्रवृत्ती च्या लोकांनी निसर्गाशी खेळून निसर्गाचा समतोल ढासळला जात आहे, वृक्ष तोड. तर जमीन खोदून भू-गर्भाला हानी पोहोचून अक्षम्य कामे चालवली जात आहेत.
स्थानिक पोलीस प्रशासन व बृहन्मुंबई प्प्रशासन पूर्णपणे मॅनेज केले असून किसी का बाप भी आयेगा तो हामारा कूच्छ नहीं बिघाड सकता असा त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. परंतु असे किती विकासक आले आणि किती गेले याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. संविधान आणि भारतीय कायद्यापुढे सर्व गौण आहे. त्यामुळे मी हे काम बंद पाडून निसर्गाचा समतोल राखणार च असा निर्धार विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर यांनी केला आहे.
शासन व प्रशासनाचे दारे ठोठावत आहे परंतु निराशा हाती येत आहे. सदरचे काम बंद नाही झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस वार्ड समोर आत्मदाह करण्याचा संकल्प केला आहे, प्रशासन दाद देणार नसेल तर आपण मा. न्यालयाल्याचा दरवाजा ठोठावर असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले तसेच याच महिन्यात सर्व निर्णय ठाम असतील असे मत समाजभूषण डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.