Home यवतमाळ यवतमाळ नगरपालिकेच्या शहर स्वच्छतेचे ऑडिट करा… महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यवतमाळ नगरपालिकेच्या शहर स्वच्छतेचे ऑडिट करा… महाराष्ट्र नवनिर्माण सेना

16

आर्णी रोडवरील नाल्यावरचे अतिक्रमण त्वरित काढा…!

शहरातील नाले साफसफाई… व रस्त्यांची कामे त्वरित करा…मनसे.

यवतमाळ शहराला मध्यभागातून जोडणारा जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूचा नाला हा अतिक्रमण व अस्वच्छते मुळे तेथील नागरिकांसाठी एक खूप मोठा यक्षप्रश्न होऊन बसला आहे. यवतमाळ शहरात एकेकाळी स्वच्छतेसाठी पुरस्कार विजेता नगरपालिका आज शहरातील घाणीच्या साम्राज्यासाठी नावावरूपास आली आहे. यवतमाळ शहरातील आणि आर्णी रोडवरील नाल्या वरचे अतिक्रमण दूर करून यवतमाळ शहरावर होणाऱ्या स्वच्छतेच्या खर्चाचा ऑडिट करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी करत मनसेने शहरातील अस्वच्छता व रस्त्याची दुरावस्था या या विषयासंदर्भात नगरपालिका यवतमाळ विरुद्ध दंड थोपटले असून आज मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासक अधिकारी नाईक यांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ शहरात मान्सूनपूर्व कामांतर्गत स्थानिक आर्णीरोड स्थित जिल्हा परिषद बिल्डिंगच्या बाजूला संदर्भात तेथील स्थानिक रहिवाशांनी आजपर्यंत न सुटलेल्या समस्यांबाबत मनसे कडे धाव घेत आपली व्यथा मांडली. आर्णी रोड परिसरातील नाला हा रेल्वे स्टेशन,वैद्य नगर,रानडे स्वीट मार्ट,अग्निशामन दल, कवर नगर, इतर परिसरातील सिमेंट काँक्रीट च्या नाल्यांचा पूर्ण प्रवाह या नाल्यावर येतो परंतु मान्सून तोंडावर असताना सुद्धा या नाल्याची अद्याप कोणत्याच प्रकारची साफसफाई न होता बेशरमाचे झाडे ताठ मानेने डौलात नाल्यात उभी आहेत. मागील ढगफुटीचा अनुभव लक्षात घेता या सर्व नाल्यांवरील अतिक्रमण व स्वच्छते संदर्भात मनसेने नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून शहरातील इतर भागातील नाल्यावरचे अतिक्रमण तात्काळ दूर करावे जेणेकरून कोणती जीवित हानी होणार नाही तसेच शहरातील चांगल्या रस्त्यांना डागडुजी करण्यापेक्षा जे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत म्हणजे ज्या रस्त्यांचीअक्षरशः चाळणी झालेली आहे अशा रस्त्यांना तात्काळ दुरुस्ती करून पावसामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी आणी शहरातील सर्व सिमेंट काँक्रीटच्या नाल्या तात्काळ स्वच्छ व्हाव्या तसेच स्वच्छतेच्या सर्व मोहिमेचे ऑडिट करावे जेणेकरून जनतेच्या घामाचे पैसे कोणाच्या घशात गेले याची शहानिशा करता येईल अशी मागणी मनसेच्या अनिल हमदापूरे यांनी केली. याप्रसंगी प्रामुख्याने मनसेचे गोपाल घोडमारे, शिवम नंदुरकर,अजय राठोड, आशिष खोके, सौरभ अनसिंगकर, आशिष सरुळकर,लकी छांगाणी, उमेश कपिले,मयूर बेलेकर, प्रथमेश मीठे याचा मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.