Home वाशिम वाशिम जिल्हा सामान्य रुग्नालयातील कार्यालय अधिक्षक सचिन बांगर रंगेहात लाच घेतांना अडकला...

वाशिम जिल्हा सामान्य रुग्नालयातील कार्यालय अधिक्षक सचिन बांगर रंगेहात लाच घेतांना अडकला एसीबीच्या जाळ्यात

59

फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम जिल्ह्यात लाच मागणीचे प्रकरण दिवसेंदिवस ऊजागर होत असुन वाशिम एसीबीचे पथक अशा लाचखोरांना कायद्याचा दणका देत आहे.अशीच एक वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धमाकेदार कारवाई वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्नालयात झाली.येथील कार्यालय अधिक्षकाला लाच घेतांना पथकाने अटक केली आहे.वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालय अधीक्षक सचिन शिवाजीराव बांगर ह्याला २५०० रुपयांची लाच घेत असताना वाशिम एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,सचिन शिवाजीराव बांगर,वय (३९ वर्ष) हा वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असून त्याने यातील तक्रारदार यांचे पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून त्यावर सही शिक्का देण्याकरिता बांगर याने दि.५/६/२०२४ रोजी पडताळणी करवाई दरम्यान ३००० रूपये मागणी करून तडजोडी अंती २५०० रूपये स्वीकारण्याचे मान्य केले व सापळा कारवाई दरम्यान आज दुपारी पंचासमक्ष २५०० रूपये स्वीकारत असताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.आरोपी सचिन बांगर याचेविरुद्ध पोस्टे.वाशीम शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई वाशिम एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोहवा.नितीन टवलारकार,विनोद मार्कंडे,योगेश खोटे यांनी यशस्वी रित्या पार पाडली.