Home जालना मैत्रेयची सिएमडी वर्षा सत्पाळकर आठ वर्षांपासून फरार ,पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदार भुमिकेबाबत गुंतवणूकदारांना...

मैत्रेयची सिएमडी वर्षा सत्पाळकर आठ वर्षांपासून फरार ,पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदार भुमिकेबाबत गुंतवणूकदारांना संशय

33

जालना /लक्ष्मण बिलोरे

२०१५-१६ च्या दरम्यान मैत्रेय ग्रुप कंपनी बंद पाडून राज्यातील लाखों गुंतवणूकदार लोकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालून नाशिक येथील सरकाररवाडा पोलिस ठाण्यातून जामिन मिळवून बाहेर पडलेली मैत्रेय कंपनीची सिएमडी वर्षा सत्पाळकर आठ वर्षांपासून फरारी आहे,असे पोलिस प्रशासनाने जाहीर केले असले तरी पोलिस प्रशासनला वर्षा सत्पाळकर कशी सापडत नाही? असा प्रश्न राज्यातील लाखों पिडित गुंतवणूकदारांना पडला आहे.मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी संघटना हि एकमेव संघटना आहे जी पिडित गुंतवणूकदारांना मैत्रेय मधील परतावे मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कार्यवाही करून मैत्रेय मॅनेजमेन्टवर गुन्हे दाखल करून संचालक मंडळातील गुन्हेगारांना अटक केलेली आहे. राज्यसरकारने मैत्रेय मालमत्ता जप्त केलेली आहे. मैत्रेय प्रकरण मुंबई कोर्टात न्यायप्रविष्ठ असल्याने मैत्रेय जप्त मालमत्तेचा लिलाव हा कोर्टाच्या आदेशावरूनच केला जाणार आहे. पिडित गुंतवणूकदारांना मैत्रेय परतावे मिळावेत यासाठी संघटना कोर्टात सातत्याने पाठपुरावा करत आहे. यासाठी संघटनेच्या वतीने मुंबई कोर्टात स्पेशल केस ११४८/२०२२ दाखल आहे. मैत्रेय प्रकरणी संघटनेच्या वतीने नियुक्त वकिल ॲडव्होकेट संतोष भटगुणांकी यांनी मैत्रेय परताव्याची मागणी केलेली आहे.
मैत्रेय ग्रुप कंपनीची सिएमडी वर्षा सत्पाळकर यांना गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. सत्पाळकरने नाशिक सरकारवाडा पोलिस ठाण्यात लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते की त्यांची सुटका झाल्यास गुंतवणूकदारांचे परतावे देण्यास बांथील आहे.दरम्यान, वर्षा सत्पाळकर यांची जामीनवर सुटका होताच त्या फरार झाल्या. राज्यातील १४ पोलिस ठाण्यात सत्पाळकरवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.मागील आठ वर्षांपासून फरार असलेली मुख्य आरोपी सत्पाळकर पोलिस प्रशासनाच्या हाती का लागत नाही? याबाबत पिडित गुंतवणूकदारांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.फरारी वर्षा सत्पाळकर पोलीस प्रशासनाला सापडत नसल्याने गृहमन्त्री देवेद्र फडणविस यांचा यामागे हात असल्याचा आरोपही गुंतवणूकदारांमधून उघडपणे केला जात आहे. मैत्रेयच्या जप्त मालमत्तेचा आदेश कोर्टातून मिळावा यासाठी संघटना मुंबई शेशन कोर्टात पाठपुरावा करत आहे.