Home यवतमाळ शेततळ्याचे अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत..

शेततळ्याचे अनुदान न मिळाल्याने शेतकरी अडचणीत..

16

बियाणे खरेदी कसे करायचे शेतकऱ्यांपुढे गहन सवाल..
—————————————-
अधिकाऱ्यांचे आश्वासन हवेत विरले
—————————————-
घाटंजी – शासन स्तरावरून मागेल त्याला शेततळे ही योजना कृषी विभागामार्फत राबविल्या जाते.यात घाटंजी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना विचारून मार्च महिन्यापर्यंत अनुदान प्राप्त होईल अश्या सांगण्यावरून आशेने जवळील पैसे गुंतवून शेततळे बांधले मात्र जून महिना उलटून चालला तरी अनुदान न मिळाल्याने बियाणे कसे खरेदी करायचे व पेरणी कशी करायची ही मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे येवून पडली आहे.
मागेल त्याला शेततळे असे मोठा गाजावाजा शेतकऱ्यांपुढे करण्यात आले.यातच सततच्या नापिकिने व निसर्गाच्या लहरीपणाने मेटाकुटीस आलेल्या बहुतांश शेतकऱ्यानी आपला शेततळ्यामुळे फायदा होईल या आशेने व कृषीविभागाच्या अधिकाऱ्याकडून मार्च महिन्यापर्यंत अनुदान मिळेल या आशेने जवळ असलेल्या पैश्याने शेततळे बांधले.मात्र मार्च महिना उलटून जून महिना उलटून चालला तरी अजून अनुदान प्राप्त झाले नसल्याने तोंडावर आलेली पेरणी कशी करावी ही मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे येवून पडली आहे.मार्च महिन्यापर्यंत अनुदान प्राप्त होईल असे सांगणारे अधिकारी आता निधीच उपलब्ध झाला नसल्याचे सांगत असल्याने शेतकऱ्यांची फरफट होतांना दिसून येत आहे.जवळचा पैसा शेततळे बांधण्यास वापरले आता बियाणे कसे खरेदी करायचे पुढील व्यवहार कसा करायचा अश्या एक ना अनेक समस्येने शेतकरी भरडला असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरल्यागत झाले आहे.त्यामुळे शेततळे लाभार्थी खचून चालला आहे.या गंभीर बाबीची माय बाप सरकारने तातडीने दखल घेऊन शेततळे अनुदान तातडीने वितरित करावे अशी मागणी शेततळे लाभार्थी शेतक्र्याकडून होत आहे.