Home बुलडाणा विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाण ठेवावी’- ज्येष्ठ पत्रकार महेंद्र बोर्डे

विद्यार्थ्यांनी पालकांच्या कष्टांची जाण ठेवावी’- ज्येष्ठ पत्रकार महेंद्र बोर्डे

51

तरुणाई फाउंडेशन ने केला यशवंतांचा गुणगौरव!!

यशवंत विद्यार्थी ;
विवेक राजगुरू 671(NEET)
कु.अश्विनी मगर 650 (NEET)
ओम भराड, एअरक्राफ्ट मॅन परीक्षेत देशात ५वा क्रमांक.

देऊळगाव माळी प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी
आई-वडिलांच्या कष्टाची जाण आणि समाजाची बांधिलकी ठेवावी तसेच यशस्वी होण्यासाठी कधीही आर्थिक परिस्थिती आड येत नसते आर्थिक परिस्थितीचा बाउ करू नये त्यासाठी फक्त प्रबळ आत्मविश्वास असणे गरजेचा आहे असे प्रतिपादन मुक्त पत्रकार महेंद्र बोर्डे यांनी केले.
दे.माळी ता.मेहकर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तरुणाई फाउंडेशनच्या वतीने नीट व एअर फोर्सच्या एअरक्राफ्ट मॅन परीक्षेत संपूर्ण देशातून पाचवा क्रमांक प्राप्त केलेल्या यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. पुढे बोलताना बोर्डे म्हणाले की स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टांची, जाणीव ठेवावी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा वाढायला हव्यात. त्यासाठीच विद्यार्थ्यांनी समाजाची बांधीलकी कायम मनात ठेवावी. तसेच, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाकडे भर दिला पाहिजे, अभ्यासातील सातत्य टिकून ठेवत स्वतःतील आत्मविश्वास प्रचंड वाढवणे गरजेचा आहे. आर्थिक परिस्थितीचा कधीही बाउ करत बसू नका असेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अशोक वाढे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन ज्येष्ठ पत्रकार महेंद्र बोर्डे, वसंतराव मगर,शामराव बळी, ,विष्णू राजगुरू, मूर्तिकार हरिभाऊ राऊत, पो.पा.गजानन चाळगे, भास्कर गवई, आश्रुजी मगर, विद्यार्थ्यांचे आई-वडील केशव भराड, गजानन राजगुरू अनिल मगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, नीट परीक्षेत 720 पैकी 671 गुण मिळवलेला विद्यार्थी विवेक गजानन राजगुरू, 650 मार्क मिळवलेली अश्विनी अनिल मगर तर एअरकॉफ्ट मॅन या परीक्षेत देशात पाचवा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल ओम केशव भराड, या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमात अशोक वाढे, विवेक राजगुरू, ओम भराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास राऊत यांनी केले तर आभार पंकज लोणकर यांनी मानले .