Home बुलडाणा शेगाव डेपोच्या वाहकाची प्रवाश्यांसोबत दादागिरी अंढेरा फाट्यावर बस थांबवण्यास नकार देत प्रवाशांना...

शेगाव डेपोच्या वाहकाची प्रवाश्यांसोबत दादागिरी अंढेरा फाट्यावर बस थांबवण्यास नकार देत प्रवाशांना उतरवले चक्क चिखलीला.

39

प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील महत्त्वाचे समजले जाणारे अंढेरा फाटा येथे १४ आॕगस्ट २०१८ रोजी च्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाच्या पञानुसार सर्व लांब पल्ला व मध्यम पल्ल्याच्या सर्व जलद बसेस नां प्रवाशांच्या मागणीनुसार थांबा देण्यात आला असुन चिखली ते अंढेरा फाटा चार्जेबल ४.५ स्टेज असुन अंढेरा वाट्याचे अॕब्रिवेशन असताना आजही अंढेरा फाट्यावर जलद आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस थांबत नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंढेरा येथील दामोदर सानप हे दि.११जुन २०२४ रोजी तहसिलच्या कामानिमित्ताने देऊळगाव राजा येथे गेले होते.आपले काम आटोपून दुपारी ते देऊळगाव राजा बसस्थानकावरुन शेगाव बस डेपोची बस क्रमांक एम.एच ४० एन.७४९८ छत्रपती संभाजीनगर -शेंगाव बसमध्ये अंढेरा फाटा येण्यासाठी बसले असता वाहकाकडे अंढेरा फाट्याचे तिकीट मागितले असता त्यांनी अंढेराफाटा थांबा नसल्याचे सांगत तिकीट देण्यास नकार दिला.गाडी थांबत नाही असे सांगून देळगावमही येथील तिकीट दिले त्यानंतर चालकाला सांगून गाडी अंढेरा फाट्यावर थांबवु नका असे सांगितले वाहकाच्या सांगण्यावरून चालकाने गाडी थांबवली नाही.देऊळगाव मही येथे काही प्रवासी अंढेरा फाटा येण्यासाठी चढले असता त्यांना अंढेरा येथे गाडी थांबत नाही बस मध्ये बसू नका असे सांगितले नंतर गाडी मेरा चौकी येथे थांबली असता उतरू दिले नाही.उलट प्रवाशासोबत वाहकाने विनाकारण वाद घालत तुम्ही आता चिखलीला चला असे सांगून चालकाला गाडी चालविण्यास सांगितले. बस चिखली बस डेपोत पोहचल्यानंतर बस मधील प्रवासी दामोदर सानप यांनी वाहकाला चिखली बस डेपोचे व्यवस्थापक लामकानी यांना भेटण्यासाठी बोलावले असता त्यांनी सांगितले त्यानांच इकडे बोलवा आणि माझ्या जवळील कागदपत्रे आधार कार्ड, हिसकावून घेतले नंतर मी गाडीकडे गेलो असता त्यांनी बस चालकाला गाडी गाडी सुरू करून गाडी चिखली बस डेपोच्या गेटमधून शेंगावकडे रवाना झाली.आता बुलढाणा येथील विभागीय रा.प.अधिकारी तसेच शेंगाव आगाराचे व्यवस्थापक आपलीच मनमानी व दादागिरी करत प्रवाशांची आणि शासनाची फसवणूक व दिशाभूल करणारे वाहक आणि चालकांवर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.