Home वाशिम कारंजा येथील समृध्दी महामार्गावर कार सह ड्रग्ज जप्त दोघाना अटक ,

कारंजा येथील समृध्दी महामार्गावर कार सह ड्रग्ज जप्त दोघाना अटक ,

79

 

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यात अवैध धंद्याच्या छोट्यामोट्या कारवायासोबत अंमली पदार्थाप्रकरणीही काही कारवाया झाल्या परंतु कारंजा येथील समृध्दी महामार्गावर पोलीसांनी ड्रग्ज जप्त केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी कारसह दोन आरोपीही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
कारंजा शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना समृद्धी महामार्गावरून एका कारमध्ये दोन व्यक्ती ड्रग घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून कारंजा शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांनी क्षणाचाही विलंब न करता सकाळी चार वाजता च्या दरम्यान समृद्धी महामार्ग येथे सापळा रचून एका लाल रंगाच्या गाडीमध्ये दोन व्यक्ती सह पाच ग्रॅम ड्रग पोलिसांनी पकडला.त्या दोन व्यक्तींना कारंजा शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून आणखी माहिती घेणे सुरू आहे. नेमका हे ड्रग नागपूरहुन तर येत नाही ना? व हे ड्रग्स नेमके कुणासाठी आणले? कुठून आणले? याची कसून चौकशी सुरू आहे.
बातमी लीहेपर्यंत आरोपी बाबत अधिकची माहिती प्राप्त झाली नाही.

*याआधीही वाशिम जिल्ह्यात झाली ड्रग्जप्रकरणी कारवाई*

वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे याआधीही ड्रग्जप्रकरणी पहिली कारवाई झाल्याचे कळते.या ड्रग्जप्रकरणाचा मानोरा काही सबंध आहे का?किंवा नेमकी कुठुन ड्रग्ज आणल्या जाते व याच्याशी सबंधीत कोणकोण आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.

जप्त करण्यात आलेली कार ,