Home यवतमाळ वरिष्ठांच्या वरदहस्ताने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बळ.

वरिष्ठांच्या वरदहस्ताने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बळ.

10

निवासी जिल्हाधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद

घाटंजी ( प्रतिनिधी )
घाटंजी तहसील कार्यालयातील वादग्रस्त नायब तहसीलदार दिलीप राठोड व मोहनिश शेलवटकर यांचे अनेक कारनामे साक्षी पुराव्यासह सिद्ध झाल्यानंतर सुद्धा फक्त वरिष्ठांच्या आशीर्वादाने यांना अजून भ्रष्टाचार करण्यासाठी बळ मिळत असताना दिसत आहे.
सविस्तर वृत्त असे की, करोडो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले दिलीप राठोड यांची प्रकरणे काढली व वरिष्ठ स्तरावरून चौकशी केल्यास त्यांनी केलेल्या गुन्ह्याने तीन रजिस्टर पूर्ण भरून जाईल तरी त्यांची भ्रष्टाचाराची मालिका संपणार नाही. असे असताना व त्यातील अनेक प्रकरणे साक्षी पुराव्यासह दोष निश्चित झाल्यानंतर सुद्धा नायब तहसीलदार दिलीप राठोड यांचे वर निवासी जिल्हाधिकारी माननीय श्री. राऊत यांनी जाणीवपूर्वक तहसीलदार घाटंजी या पदाचा पदभार सोपविला यामुळे तहसील कर्मचारी वर्तुळात दिलीप राठोड यांच्या “भ्रष्टाचारातील हिस्सा” या विषयावर चांगली चर्चा रंगलेली दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जाणून-बुजून कारवाई केल्या जात नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे दिनांक 27 जून 2024 रोजी चालू होणाऱ्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये या संपूर्ण संदर्भात पुराव्यानिशी प्रकरणे व दोषी अधिकाऱ्यांवर सक्त आणि तात्काळ कारवाईसाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळेल याकरिता लक्षवेधी प्रश्न मध्ये तारांकित केलेले आहेत.
मौजे बिलायता तालुका घाटंजी येथील जवळ जवळ तीनशे ब्रास जप्त केलेली पंचनामा झालेली रेती चोरी प्रकरणात घाटंजी तहसील कार्यालयातील कर्मचारी, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे 155 अंतर्गत लाखो रुपये घेऊन पारित केलेले आदेश शिक्षण विभागातील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार, त्याचसोबत अनेक भ्रष्टाचाराचे कारणामे दिलीप राठोड हा राजरोसपणे करीत आहे. एवढेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी खुलेआम वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावासहित चर्चा केली जाते, त्यामुळे वरिष्ठांच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय द्वेष निर्माण होत असून ही बाब समाजासाठी अतिशय घातक ठरत आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दिलीप राठोड व मोहनीश शेलवटकर यांच्यावर तात्काळ कारवाई न केल्यास याचे परिणाम अतिशय भयंकर होण्याचे संकेत नाकारता येत नाही आणि त्याचे पडसाद वरिष्ठांना सुद्धा भोगावे लागणार हे निश्चित