Home यवतमाळ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे कडून डॉ. नितीन खर्चे यांच्या नियुक्ती बद्दल सत्कार

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे कडून डॉ. नितीन खर्चे यांच्या नियुक्ती बद्दल सत्कार

9

राळेगाव :—- महाराष्ट्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या दि. यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अभाविप चे पूर्व विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांची नुकतीच सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.तसेच

डॉ. नितीन खर्चे हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व असून सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. त्याच्या या बँकेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती मुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने त्यांचा आज दिनांक 26 जून रोजी सत्कार व अभिनंदन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष ताराचंद चव्हाण, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजेश मदने , जिल्हा कार्यवाह संतोष पवार नितीन देशपांडे, जुनी पेन्शन योजनेचे राज्याध्यक्ष संजय यवतकर,कोंडावार सर,सुधीर कानतोडे,विनोद चिरडे राळेगाव तालुका अध्यक्ष यांच्या सह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.