Home महत्वाची बातमी बोरिवलीत दुधाच्या पिशव्या विकणारा पोरगा ‘वर्ल्ड चॅम्पियन’होतो तेव्हा …

बोरिवलीत दुधाच्या पिशव्या विकणारा पोरगा ‘वर्ल्ड चॅम्पियन’होतो तेव्हा …

14

दिल्ली – ज्या रोहित शर्माने लहानपणी खडतर परिस्थितीमुळे बोरिवलीमध्ये उपजीविकेसाठी दुधाच्या पिशव्या विकल्या आज त्या मुलाने भारताला t20 चा वर्ल्ड चॅम्पियन त्यांना बनवले आहे. प्रत्येकाचा आपला संघर्ष असतो आणि तो आपापल्या ठिकाणी ग्रेट असतो. रोहित असेल किंवा कोहली असेल या दोन महत्त्वाच्या खेळाडूंचं स्वप्न हे भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवायचं होतं.मात्र नशिबाने या दोघांनाही प्रचंड टॅलेंट असूनही सतत हुलकावणी दिली परीक्षा पाहिली. सहा आठ महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये ट्रेविस हेड नावाच्या मुच्छड झंजावाताने जेव्हा ती मॅच आपल्यापासून हिसकावून घेतली त्यावेळी अश्रू ढाळणारा रोहित विराट आणि क्रिकेट मधला सज्जन महापुरुष राहुल द्रविड यांची निराशा दुःख पाहून सगळेच हळहळले, त्यांचे अश्रू सगळ्यांच्याच जिव्हारी लागले. त्यानंतर ट्वेन्टी 20 वर्ल्ड कप जिंकायचा असा चंग बांधून रोहित आणि त्याचा चमू मैदानात उतरला आणि त्यांनी आज संबंध देशवासियांची कामनापूर्ती केली. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या चितेला अग्नी दिल्यावर जो खेळाडू तातडीने दिल्लीचा सामना वाचवण्यासाठी फिरोजशाह कोटला मैदानात उतरतो, त्याची कमिटमेंट अशी वाया जाणारच नव्हती. फक्त योग्य वेळ येत नव्हती. कल इंतजार की घडी खतम हो गयी. जो पोरगा लहानपणी दुधाच्या पिशव्या विकून इथंपर्यंत पोहोचला मुंबईला त्यांना अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून दिले, तो अत्यंत उमदा असा रोहित कधी हरणारा नव्हता कुलदीप यादव काय किंवा यूपी मधून मुंबईतून अतिशय उशिरा संधी मिळालेला सूर्यकुमार असेल या सगळ्यांचा संघर्ष विलक्षण होता आणि आहे सुर्यकुमारने घेतलेला किलर मिलरचा catch क्रिकेट इतिहासात अजरामर झालाय. रोहित, विराट या सगळ्यांच्या संघर्षावरती धोनी untold story सारखा सिनेमा बनेल की नाही सांगता येत नाही. मात्र या सगळ्या संघर्ष योध्यांनी काल रात्री प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आपल्या विजयाची ब्लॉकबस्टर मुव्ही कोरली. अर्षदीपसिंग पंजाब मधल्या मध्यमवर्गीय सरदार मुलगा असेल किंवा ज्याला लहानपणी अन्नाची भ्रांत होती असा हार्दिक पांड्या, प्रत्येकाचे हात विजयाच्या ट्रॉफीसाठी झटलेले आहेत. या सगळ्यांची मेहनत फळाला आली आहे. राहुल द्रविड सारख्या क्रिकेटमधल्या ‘शापित गंधर्वा’ ला आयुष्यात कधीच विजेतेपदाच्या ट्रॉफी ला ‘हात’ लावण्याचे भाग्य मिळाले नव्हते. मात्र काल ‘इंदिरानगर का गुंडा’ अशी उपवासात्मक इमेज असलेल्या राहुल द्रविड चा जल्लोष पाहिला आणि खरोखर आहे असं वाटलं ‘नियती न्याय करत असते’ नियतीने काल न्याय केला भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…!!

भारताच्या क्रिकेट इतिहासामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली नावाचे सोनेरी पर्व आलं होतं काल टी ट्वेंटी विजेतेपदासोबत हे पर्व थांबलं.
ट्वेंटी-ट्वेंटी च्या मॅचेस पाहताना हे दोघेही नाही ही कल्पनाही केली जात नाही.करवली जात नाही..
एका गोष्टीचं वाईट वाटतं, या टीम सर्वात मोठा शापित गंधर्व दिनेश कार्तिक असायला हवा होता. नशिबाने त्याला कधीच साथ दिली नाही. त् नियतीने त्याच्या बाबतीत न्याय करायला हवा होता.. असो.

नीलेशकुमार कुलकर्णी
ब्युरो चीफ,
नवी दिल्ली.