Home यवतमाळ रूपाली मानेकर तलाठी यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करा “कार्यवाही न झाल्यास उपोषण...

रूपाली मानेकर तलाठी यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करा “कार्यवाही न झाल्यास उपोषण करणार” – रुस्तम शेख

7

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी :- कळंब तहसील कार्यालयात कार्यरत असलेले कु. आर एस मानेकर तलाठी यांना केंद्रीय माहिती अधिकार २००५ कलम ६(१) अन्वये जोडपत्र दाखल केले होते त्या अनुषंगाने संबंधित जन माहिती अधिकारी तथा कात्री येथील तत्कालीन तलाठी कु. आर एस मानेकर यांनी माहिती पोस्ट द्वारे दिली .

परंतु माहिती देत असतांना त्यामध्ये कार्यालयीन पत्ता ,मोबाईल नं , अपिल करण्याचा कालावधी , प्रथम अपिलीय माहिती अधिकारीचा पत्ता , बोधचिन्ह इ मुलभुत माहिती नमुद केलेली नाही त्यामुळे त्यांनी केंद्रीय माहिती अधिकार कायद्याचा तसेच शासन परिपत्रकाचे उल्लघंन (भंग) केले आहे .

त्यामुळे संबंधित जन माहिती अधिकारी यांनी कर्तव्यचे पालन करण्यास कसूर केल्या बद्दल यांच्या वर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अधिनियम १९७९ अन्वये शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदना द्वारे केली आहे.

या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत वरील विषयाच्या संदर्भात योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्या बाबत उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार कळंब यांना पत्रा द्वारे सूचित करण्यात आले आहे.

परंतु अजून पर्यंत संबंधित जन माहिती अधिकारी तथा तलाठी यांच्या वर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्या मुळे विभागीय आयुक्त अमरावती यांच्या कडे तक्रार दाखल करणार तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबित करण्यात येईल असा तिर्व इशारा राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य रुस्तम शेख यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिला आहे.