बडनेरा येथून धनज बुद्रुक मध्ये सुगंधित गुटख्याचा शिरकाव
फुलचंद भगत
वाशिम:- कारंजा तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत धनज बुद्रुक परिसरातील येत असलेल्या जवळपास चाळीस गावामध्ये एक युवक आपल्या मोटरसायकलने सुगंधित गुटखा विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे.तो युवक बडनेरा येथून सुगंधित गुटक्याचा माल धनज बुद्रुक येथे पोहोचवण्यासाठी येतो अशी परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे.कर्तव्यदक्ष पोलीसविभागाने गुटखा तस्करी परिसरातुन हद्दपार करावी अशी मागणी होत आहे.याप्रकरणी एका सामाजीक कार्यकर्त्याने वरिष्ठ प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली होती परंतु कारवाई माञ न झाल्याचे दिसते.
सुञाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार धनज बुद्रुक येथील एक युवक आपल्या मोटर सायकलने धनज बुद्रुक बस स्टॉप येथून गुटख्याची विक्री करत धनज बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिंगण वाडी रहाटी धनज खुर्द माळेगाव धोत्रा जहागीर मसला टाकळी डोंगरगाव बेलखेड कामठा कामरगाव बेंबळा औरंगपूर ब्राह्मणवाडा मुंडे अशा गावांमधील किराणा दुकान पान सेंटर चहा कॅन्टीन अशा व्यवसाय करणाऱ्यांना सुगंधित गुटखा आपल्या मोटरसायकलने विक्री करतो.हा सर्व गंभीर प्रकार दिवसाढवळ्या होत असून धनज बुद्रुक पोलिसांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे वरिष्ठाकडे केली होती परंतु कारवाई न झाल्याने आतातरी पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.नेमका या गुटखा विक्री करणाऱ्या युवकावर कुणाचा आशीर्वाद असावा?असाही प्रश्न आता ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे. गुटखा विक्री करणारा युवक हा दिवसा ढवळ्या आपल्या मोटरसायकलने पोलीस स्टेशन धनज बुद्रुक परिसरामध्ये सुगंधित गुटखा विक्री करतो ही माहिती काही मेहेरबान संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती असतांना सुद्धा आंधळेपणा असल्याचे नाट्य रचविल्या जात आहे का? हे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी लक्ष घालुन कारवाई अपेक्षीत आहे.एकीकडे प्रशासनाने तंबाखूजन्य पदार्थावर आळा घातला असून कठोर कारवाहीचे सुद्धा आदेश दिले आहे मात्र काही मेहरबान लोकांच्या आशीर्वादाने सुगंधित गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असावा? शासनाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करून सुगंधित गुटखा विक्री करणाऱ्या युवकाला अभय देत आहे का?होत असलेल्या प्रकारावर धनज बुद्रुक पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.