Home यवतमाळ गो तस्कर जितू पांडेला तात्काळ अटक न झाल्यास अनेक हिंदू संघटनांमार्फत आंदोलनाचा...

गो तस्कर जितू पांडेला तात्काळ अटक न झाल्यास अनेक हिंदू संघटनांमार्फत आंदोलनाचा इशारा.

80

घाटंजी ( प्रतिनिधी ) – कुख्यात गोतस्कर व रेती तस्कर जितू पांडे यांना तात्काळ अटक न झाल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 28/ 6/ 2024 रोजी उत्तर प्रदेश मधून केरळला जाणारा गोवंशाची तस्करी करून अवैध वाहतूक करणारा कंटेनर पांढरकवडा पोलिसांनी पकडला व त्यातून अनेक समाजातील पांढरपेशे समाजकंटक प्रसिद्धी झोकात आले त्यातलाच जितू पांडे नामक गो तस्कर व रेती तस्करी चा व्यवसाय करणारा उच्चभ्रू प्रकाशात आला.
गो शाळेच्या नावाखाली गेल्या बरेच काळापासून सरकारी यंत्रणेला हाताशी धरून संगनमताने जितू पांडे नामक व्यक्ती अतिशय हुशारीने Sbse राहून गोवंशाच्या तस्करीचा गोरख धंदा करीत असल्याचे निश्चित झाले. जितू पांडे सोबत अनेक प्रतिष्ठित परंतु हिंदू सोडून दुसऱ्या धर्माचे गो तस्कर संगनमताने हा गोरख धंदा चालत असल्याचे सुद्धा माहिती परिसरातील लोकांकडून मिळाली.
हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्या हिंदू बाबत ठोस पाऊल उचलल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही कारण यामुळे समाजात अराजकता माजून हिंदू धर्मातील नवतरुण चुकीच्या किंवा पतनाच्या दिशेने जाण्यास प्रोत्साहित होऊ शकते. म्हणजेच त्याचे पडसाद सर्वांना भोगावे लागेल याकरिता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, व अन्य हिंदू संघटनांच्या मुख्य कार्यकर्त्यांनी गुप्त बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतील मुख्य मुद्दा म्हणजे जितू पांडे नामक व्यक्तीवर तात्काळ ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय.