Home जालना मैत्रेयच्या पैशासाठी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला !

मैत्रेयच्या पैशासाठी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला !

40

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पिडित गुंतवणूकदारांना दिसला आशेचा किरण…

जालना/लक्ष्मण बिलोरे

*-मैत्रेय ग्रुप कंपनी बंद पडून ८ वर्षे होवून गेले आहेत. मैत्रेय कंपनीने १६ वर्षात राज्य आणि राज्याबाहेरील लाखों गुंतवणूकदारांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली आहे.सर्वसामान्य गोरगरिब मजूर,धुणीभांडी करणाऱ्या महिला,शेतकरी, शेतमजूर,छोटेमोठे व्यापारी,कामगार, नोकरदार. ..अशा लाखों लोकांना मैत्रेय कंपनीने नियुक्त केलेल्या एजंट- सिनियर लोकांच्या माध्यमातून भरघोश परतावा देण्याचे अमिष दाखवून गोरगरिबांना लुटून मैत्रेय संचालक मंडळ आणि सिनियर लाईन मधील लोकांनी स्वतःची घरे भरली. संबंधितांवर या प्रकरणी गुन्हे दाखल असून मैत्रेय प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.८ वर्षे होवूनही अजूनही पिडित गुंतवणूकदारांना परतावे मिळाले नाहीत.*
चौकट
————–
सेशन कोर्टात आधी फक्त एकाच नोटिफिकेशन मधील मैत्रेय जप्त मालमत्ता विक्री संदर्भात विचार केला जात होता.आता मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण ६ नोटिफिकेशन्सच्या संदर्भात त्या सर्व मालमत्तेची पडताळणी करून विक्री करण्याची परवानगी देवून मैत्रेयच्या जप्त करण्यात आलेल्या त्या मालमत्ता लवकरात लवकर विक्री करून पिडित गुंतवणूकदारांना पैशे परत करा ,असा आदेश दिला आहे. त्यासाठी मुदत चार आठवड्याचीच दिली गेली आहे. त्यासाठी कोर्टाने पुढील तारीख २९ जुलै २०२४ दिली आहे.
संगीता कदम, अध्यक्ष
गुंतवणूकदार संघटना
_____________
१९९८ साली मैत्रेय ग्रुप कंपनीने ठाणे शहरात छोटेखानी कार्यालय सुरू करून इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली.सुरूवातीला मुबलक व्याज देवून गुंतवणूकदारांना परतावे दिले गेले.त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. मैत्रेयचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन सत्पाळकर यांचे २००३ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात् वर्षा सत्पाळकर यांनी मैत्रेयचे कामकाज हाती घेतले.संचालक मंडळ आणि सिनियरांच्या माध्यमातून लाखों गुंतवणूकदार लोकांकडून कोट्यावधी रूपयांची मालमत्ता जमा केली आणि २०१५-१६ च्या दरम्यान मैत्रेय ग्रुप कंपनी जाणीवपूर्वक बंद करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.यामुळे लाखों पिडित गुंतवणूकदार हैराण झाले. राज्यभरात उपोषण, मोर्चे,आंदोलनं झाली.शासन प्रशासनाकडे निवेदनांचा भडिमार करून पाठपुरावा केला गेला.मैत्रेय सिएमडी वर्षा सत्पाळकर परतावे परत देण्याचे लेखी आश्वासन देवून जामिनावर जेलमधून बाहेर पडली आणि फरार आहे.पावसाळ्यातील छत्री प्रमाणे पिडित गुंतवणूकदारांना परतावे मिळवून देण्यासाठी अनेक संस्था, संघटना, परिषदा अस्तित्वात आल्या परंतु मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटना हि एकमेव अधिकृत संघटना आहे या संघटनेने प्रथम कोर्टात केस दाखल करून पिडित गुंतवणूकदारांना परतावे मिळावेत अशी मागणी केली.