Home बुलडाणा साखरखेर्डा येथे सुरू असलेले नमो ग्राम सचिवालय चे बेकायदेशिर बांधकाम त्वरित थांबविण्यात...

साखरखेर्डा येथे सुरू असलेले नमो ग्राम सचिवालय चे बेकायदेशिर बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे ,

58

 

जिल्हाधिकार्याकडे निवेदनाव्दारे मागणी ,

अमीन शाह ,

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे गरज नसतांना बांधण्यात येत असलेल्या बे कायदेशीर नमो ग्राम सचिवालय चे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाव्दारे केली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार
साखरखेर्डा गावाकरीता सन 2023-2024 मध्ये नमो ग्रामसचिवालय किंमत 47,79,597/- अक्षरी सत्तेचाळीस लाख एकोणएंशी हजार पाचशे सत्यान्नव रुपये एवढा निधी मंजुर झालेला आहे. व त्याचे काम जिल्हा परीषद बांधकाम विभागाकडुन केले जात आहे.
सदरचे नमो ग्रामसचिवालय गावाच्या मध्यभागापासुन दोन कि.मी. अंतरावर बांधले जात आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायती जवळ स्वत:चे मालकिची गावठाणामध्ये नझुल शिट नंबर 01 मधील प्लॉट नंबर 08 क्षेत्र 5965.5 चौ.मी एवढी विपुल प्रमाणात जागा उपलब्ध असुन त्यावर बांधकाम होणे आवश्यक आहे. किंवा गट नंबर 665 क्षेत्र 6.81.44 हे.आर सरकार या जमिनीपैकि, बांधकामासाठी आवश्यक जागेची ग्रामपंचायत किंवा बांधकाम विभागाने रितसर मा.जिल्हाधिकारी यांना जागा मागणी प्रस्ताव सादर करुन मा.जिल्हाधिकारी यांची मंजुरात घेतल्यानंतरच बांधकाम करणे आवश्यक व नियमोचीत होते व आहे. परंतु महसुल विभागाची कोणतीही परवाणगी न घेता सदरचे बेकायदेशिर बांधकाम जिल्हा परीषद बांधकाम विभाग हे मोजे साखरखेर्डा येथील गट नं.665 सरकार या गायरान जमिनीवर बेकायदेशिरपणे बेकायदेशिर करीत आहे.
साखरखेर्डा हे गाव तालुका निर्मीतीसाठी शासनस्तरावर विचारधिन आहे. तसेच सदर गटामध्ये सरकारी क्रीडांगणाचे बांधकामासाठी जागा मागणी प्रस्ताव तहसिलदार सिंदखेडराजाकडे प्रलंबीत आहे. भविष्यात या जागेवर तहसिल कार्यालय व गावकऱ्यासांठी अडचन विरहीत क्रींडागण तयार होवु शकतो,
नमो ग्रामसचिवालयाचे बेकायदेशिर बांधकाम झाल्यास सरकारी जमिनीचे अपव्यय होईल, सदरचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाकडुन खडडे खोदण्यात आलेले आहे. तरी तात्काळ सदरचे बांधकाम थांबवुन, ग्रामसिचावालयाचे बांधकाम ग्रामपंचायत मालकिची जागा गावठाणातील नझुल शिट नंबर 01 मधील प्लॉट नंबर 08 क्षेत्र 5665.5 चौ.मी या जागेवर करण्याचे आदेश देण्यात यावे व गट नं.665 मधील सरकारी जमीन गावकऱ्यांसाठी व सरकारी कामासाठी वाचविण्यात यावी सुरू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी साखरखेर्डा येथील
त्र्यंबक प्रभाकर देशपांडे,
ग्रामपंचायत सदस्य
. सौ.सुनीता दिलीप बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य
गोपाल रामसिंग शिराळे, तंटामुक्ती समिती सदस्य (R.T.I.Activist)
दत्तात्रय माधु लष्कर, सामाजीक कार्यकर्ता.
गणेश धनसिंग शिराळे, सामाजिक कार्यकर्ता यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा , मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा , कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या कडे दि , 12 , 7 , 2024 रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे ,

गुपचूप बांधकाम सुरू ,

साखरखेर्डा येथील गट नंबर 665 मध्ये गायरान सरकारी जमिनीवर नमो ग्राम सचिवालय चे बांधकाम मर्जीतील ठेकेदारा व्दारे अत्यन्त गुपचूप पद्धतीने सुरू करण्यात आले आहे या कामात मोठं काळा बेरा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ,

गरज नसतांना बांधकाम ,

साखरखेर्डा येथे या पूर्वीच तीन ग्राम सचिवालय अस्तित्वात असून ते सुसज्ज अवस्थेत असून गावाच्या मध्य भागी अस्तित्वात आहेत लाखो रुपये खर्च करून येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या ग्राम सचिवालय ची तीन मजली इमारत असून येथे सुसज्ज ग्राम पंचायत कार्यालय मिटिंग हॉल सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी यांना कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र केबिन रूम आहेत हे कार्यालय गावाच्या मध्यभागी आज ही सुरू आहे नवीन ग्राम पंचायत भवन हा गावाच्या दोन किलो मीटर बाहेर होणार आहे त्यामुळे येथील नागरिकांना तेथे जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागणार आहे सुसज्ज ग्राम पंचायत कार्यालय असतांना सुद्धा दुसरं बांधकाम म्हणजे जनतेच्या घामाच्या पैश्याची उधळपट्टी असल्याचे दिसत आहे ,

जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी ?

येथील गट नंबर 665 मध्ये सुरू असलेल्या नमो ग्राम सचिवालय बांधकामास जिल्हाधिकारी साहेबांची व इतरांची परवानगी नसल्याची ही धक्कादायक बाब समोर आली असून जिल्हाधिकारी साहेबांच्या परवानगी शिवाय मर्जीतील ठेकेदारास हाताशी धरून हे बांधकाम सुरू असल्याचे समजते याची ही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे ,