Home भंडारा विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

55

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे सिडबॉल वितरण

भंडारा :- आज स्पर्धेच्या युगात शालेय विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी हे विविध अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उंच भरारी घेत शासकीय -निमशासकिय हुद्यावर कार्यरत आहेत. मात्र ते सामाजिक बांधिलकी विसरत चालले आहेत. मात्र स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान बेलगाव/मांडवी येथील नवतरुण उत्साही मंडळींनी शालेय विद्यार्थी -विद्यार्थ्यींनी करिता विविध प्रकारचे अभिनव उपक्रम राबवित आहेत. विद्यार्थी -विद्यार्थीनी उन्हात बसले असतांना सुध्दा कुठलाही आवाज नाही. अशाप्रकारे शिस्तबध विद्यार्थी प्रथमच पहात आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच येथील शालेय विद्यार्थ्यांकडे पाहिल्यावर मला जुने दिवस लक्षात आले. त्यावेळी दुपारच्या सत्रानंतर श्रमदान, कार्यानुभव अशाप्रकारे विविध उपक्रम राबविले जात होते. म्हणून आज वाढदिवस, लग्न, शहिदांच्या आठवणीत किमान एक-दोन वृक्ष लागवड करावे. शालेय विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी प्रेम निर्माण व्हावे कारण वृक्ष जगले तर मानव जगेल या उद्देशाने प्रतिष्ठान कार्यरत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक घनश्याम खराबे यांनी केले.
ते स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान बेलगाव व कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व अकरा हजार एकसे अकरा विविध प्रजातींचे सिडबॉल वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक घनश्याम खराबे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधिकारी एम.एन. खराबे, कृषि परिवेक्षक ए. एन. हारोडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे जिल्हा सदस्य विलास केजरकर, कस्तुरबा गांधी विद्यालयाचे प्राचार्य संजीव कुकडे, ग्राम सचिव व्हि. डब्लु. भिमटे, बेलगावच्या सरपंच रिना तुमसरे, मांडवी येथील तलाठी मिनाक्षी रामटेके, कृषी सेवक जी. एन. मलेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे आगमन होताच शाळेच्या मुख्य फाटके समोर कुंम्कुंम तिलक व अंक्षवन करून फुलांचा वर्षाव करत लेझीम पथकाच्या माध्यमातून कार्यक्रम स्थळी नेण्यात आले. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व विद्येचे दैवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. शालेय विद्यार्थीनींनी स्वागत गिताने स्वागत करण्यात आले. मान्यवरांचे शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत – सत्कार करण्यात आले.
ग्रामीण भागातील शाळा व स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध स्तुत्य उपक्रम राबविले जातात हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. अशाप्रकारे सर्वांगिण विकासासाठी सदैव झटणारे उत्साही नवतरुण शोधल्याने मिळत नाही. हे आपली जमेची बाजू आहे. अशाप्रकारे शिस्तबध विद्यार्थी -विद्यार्थीनींनी आणि राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. आंबा, चिंच व सिताफळ यांचे झाड लावावे. जेणेकरून पर्यावरणाबरोबर पशु-पक्ष्यांचे समतोल राखणे गरजेचे आहे. शिक्षक विविध उपक्रमातून शिकवित असतात. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे कारण शिक्षणाने जिवनाची दिशा ठरविता येत असते. असे मत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांनी व्यक्त केले.
त्यावेळी उपस्थित जिल्हा कृषी अधिकारी एम.एन. खराबे, कृषि परिवेक्षक ए. एन. हारोडे, ग्राम सचिव व्हि. डब्लु. भिमटे व मान्यवरांनी वृक्षारोपण व अकरा हजार एकसे अकरा विविध प्रजातींचे सिडबॉलचे महत्त्व व शासनाच्या विविध योजनावर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास धरमशहारे व प्रास्ताविक स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे हिरालाल बाभरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक संजीव कुकडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमराज (सोनू) शेंडे, ओ. एल. शेंडे, एच. डी. संग्रामे, कांबळे, मस्के, नैताम, कार्तिक देशमुख, प्रविण बोरकर, अनिता बुजाडे, गोवर्धन बडोले, अन्नपुर्णा भोंडे, सुमित आग्रे, शुभ्राली मोटघरे, प्रतिक्षा नेरकर, मयुरी बुजाडे, अनुप सार्वे, प्रिया नेरकर, प्रतिक्षा ठवकर, कल्याणी नेरकर तसेच स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक – शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी सहकार्य केले.