Home यवतमाळ भोसा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्मारकाचे अनावरण….

भोसा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्मारकाचे अनावरण….

29

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचा पुढाकार..
—————————————-
यवतमाळ – स्थानिक भोसा स्थित घाटंजी रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज चौक व स्मारकाचे अनावरण दिनांक १२ जुलै २०२४ रोज शुक्रवार ला मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला.
भोसा येथिल घाटंजी रोड वर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे यवतमाळ शहर युवा सेना संघटक विशाल भिवगडे व मित्र मंडळांनी एक महत्वाच्या वर्दळीचे ठिकाण निवडून छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्यावे ही संकलपणा मनाशी बाळगली.आणि दिनांक १२ जुलै २०२४ रोज शुक्रवार ला वास्तवात उतरवून मोठ्या उत्साहात सोहळ्याचे आयोजन करून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर उद्घाटक म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे माजी जिल्हा प्रमुख कट्टर शिवसैनिक संतोष भाऊ ढवळे यांच्या हस्ते संपर्क प्रमुख राजेन्द्रभाऊ गायकवाड, किशोर भाऊ इंगळे,यवतमाळ शहर प्रमुख विनोदभाऊ पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेशभाऊ सावरकर,कल्पणाताई दरवई,मंदाताई गाडेकर, भाई अमन,नितीन मिर्झापूरे,सूरज खोब्रागडे, अतुलभाऊ गुल्हाने,चेतन सिरसाठ, सय्यद दाऊद सय्यद मुसा, नंदाताई भिवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे अनावरण करून चौकाला छत्रपती शिवाजी महाराज नामकरण करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व शाल श्रीफळ देऊन शिवशैनिकाकडून सत्कार करण्यात आले. या सोहळ्यात बाळासाहेब मांगुलकर,संतोषभाऊ ढवळे, राजेन्द्रभाऊ गायकवाड,किशोरभाऊ इंगळे,भाई अमन यांनी संभोदीत करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपटलावर प्रकाश टाकून ती प्रेरणा अंगिकारावी असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव दिल्याने आयोजकांचे अभिनंदन केले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन राजू चव्हाण यांनी केले.यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे भोसा परिसरातील पदाधिकारी शिवसैनिक,शिवप्रेमी यांचेसह शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले होते.अखेर डीजेच्या तालावर ठेका धरत तरुणाई मंडळीनी आनोत्सव साजरा केला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशाल भिवगडे मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले.