Home बुलडाणा साखरखेर्डा येथे महोरम मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी अटक आरोपींची रवानगी कारागृहात ,

साखरखेर्डा येथे महोरम मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी अटक आरोपींची रवानगी कारागृहात ,

45

 

11 तरुणांना अटक, तणावाचे वातावरण निवळले

खासदार, आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतलं परस्तिथीचा आढावा .

 

अमीन शाह

साखरखेर्डा

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठे गाव साखरखेर्डा येथे काल सायंकाळी ७ वाजता महोरम ताजिया विसर्जन मिरवणुकीत काही तरुणांनी दगडफेक केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेकजण जखमी झाले होते तसेच पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. होती याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शनिवारी साखरखेर्डा येथे म्होरम निमित्त ताजिया मिरवणूक काढण्यात आली होती , माळी पेठ भागातील मारोती मंदिरासमोर मिरवणुकीत नाचणाऱ्या काही तरुणांवर अचानक दगडफेक सुरू झाली .या दगडफेकीत माजी उपसरपंच शेख अय्युब कुरेशी, माजी सरपंच कमलाकर गवई, माजी जि.परिषद सदस्य राम जाधव हे दगडफेकीत जखमी झाले होते दगडफेकीतील काही जखमींना उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून, कलम 132, 189, 191, 190, 191, 2, 125, 324, 121, 221 nbs 135 मापोका कलम 3 नुसार
राहुल नन्हइ , हर्षल खरात , आकाश निकम गोपाल रमेश इंगळे सुरज सुभाष जयस्वाल उमेश गणेश नगरकर धर्मा रामा मंडळकर कार्तीक विनायक शहाने महेश खरात नंदु मंडळकर जगदीश जगताप मोहन वाघमारे योगेश नन्हइ .गुड्डु इंगळे निलेश रमेश मोरे , दत्ता जगताप प्रफुल राजु अवचार सोनु दस्सा वसीम कुरेशी समीर काजी 21 दानिश कुरेशी जहीर शाह , जाबाज शाह .राजु सययद फस्सी इलीयास काजी बबलु पठाण . शे. अर्शीद .शे. आरीफ . जिल्लु कुरेशी अकीब पठाण . शेख आयुब शेख मुसा सलीम शेख शेख दानिश शेख अजीज कुरेशी व इतर रा साखरखेर्डा यांच्या विरुद्ध वरील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना आज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली आहे ,

खासदार आमदाराची भेट,

आज बुलडाणा जिल्ह्याचे खासदार, मंत्री प्रतापराव जाधव, सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार, माजी मंत्री आमदार डॉ ,राजेंद्र शिंगणे यांनी दोन्ही समाजातील लोकांची पोलीस ठाण्यात बैठक घेऊन घटनेचा आढावा घेऊन पोलीस विभागाला सूचना केल्या की कोणत्याही निरपराध युवकांना अटक करू नका, खऱ्या गुन्हेगारांना पकडा.

शांतता समितीची बैठक,

आज जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी दोन्ही समाजाची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव मेजर अर्जुन गवई , दसरे सर आदींनी मनोगत व्यक्त केले या बैठकीत अपर पोलीस अधीक्षक बी, महामुनी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार स्वप्नील नाईक, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह सर्व समाजातील परतिषठित लोक उपस्थित होते.

तणावपूर्ण शांतता,

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे, पोलीस विभागाचे अटक सत्र सुरू आहे, आज शहरातील सर्व दुकाने आज बंद होती, दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारही बंद होता, यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपायांचे नुकसान झाले सर्वत्र शुकशुकाट दिसत होता ,

11 आरोपींना अटक

याप्रकरणी पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार
उमेश गणेश नगरकर, कार्तिक विनायक शहाणे , महेश परमेश्वर खरात. मोहन ज्ञानेश्वर वाघमारे, गोपाल रमेश इंगळे, सागर शामराव दसरे, राहुल समाधान नन्हाई , हन्नान शाह मन्नान शाह ,मेहबूब शाह रहीम शाह ,तैहजीब शाह अकील शाह शेख रिजवान शेख अयुब उर्फ सद्दाम, सर्व रा. साखरखेर्डा, त्यांना आज अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध घेतलं जातं आहे.