एका कर्तव्य दक्ष पोलीस अधिकार्यांचा अविस्मरणीय क्षण
मुंबई सुरेश वाघमारे
पोलीस प्रशासनाबाबत सांगायचे झाले तर जगात स्कॉटलंड पोलीस एक नंबर आणि गुन्ह्याचा छडा लावण्यात मुंबई पोलीस दोन नंबर असा क्रम लागतो, विशेष वृतांत असे की महाराष्ट्र मधील अहमदनगर या धरती मधून पोलीस विभागात दाखल झालेले मालवणी पोलीस विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्य दक्ष अधिकारी मा, चिमाजी आढाव राष्ट्रपती पदकाने नुकतेच सन्मानित झाले असून त्यांना महाराष्ट्र चे राज्यपाल यांच्या शुभहस्ते राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले आहे, यापूर्वी भायखळा पोलिस ठाणे येथे सुद्धा गृह विभागाणे उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढाव यांना पुरस्कार देण्यात आला असून पोलिस खात्यामधिल 29 वर्षात विविध सन्मान त्याना आजवर प्राप्त झाले आहेत, विशेष सांगायचे म्हणजे मुंबई मधील मालाड पश्चिम येथील मालवणी पोलीस ठाणे येथील पदभार गेल्या दिनांक 10/6/2023रोजी स्वीकारला तेंव्हा पासून अवघ्या एक वर्षांमध्ये, मालवणी मधील हिंदू मुस्लिम वाद सर्वाना माहित आहे वास्तवात इथे सर्व जण भाईचाऱ्याने गुण्या गोविदाणे नांदतात मात्र एखादी क्षय घटनेमुळे राजकीय सत्ताकेंद्र ठरलेले मालवणी हे अंत्यत संवेदनशील असे झाले आहे, मात्र पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या प्रत्येक तक्रार दाराला योग्य त्या पद्धतीने समुपदेशन व त्याचे समाधान करण्याचे काम मा, चिमाजी आढाव साहेब यांच्या मार्गदर्शन खाली संपूर्ण मालवणी पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत, विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती ती पासून तर कावड यात्रा जुलूस रॅली, अथवा मोर्चे आंदोलने सभा या सर्व घटनेवर नीट चोख बंदोबस्त ठेऊन स्वतः सर्व समारंभ यशस्वीरित्या पार पडलेले असून, त्याच्या स्वभावमध्ये वेगळाच माणुसकीचा आयम आहे, प्रत्येक सामाजिक राजकीय पदाधिकारी यांना सामान्य नागरिक शोषित पिढीताना आढाव साहेब आपुलकीने विचारपूस करून अन्याय करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे व अन्यायाला वाचा फोडणारे यापूर्वी गुन्हे विभागात काम करणारे एकात्मता जोपसणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून, अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात परांगत असे आवलीय चिमाजी आढाव पोलिस अधिकारी असून दिनांक 20/7/2024रोजी महराष्ट्र राज्याचे मंत्री सुधीरभाऊ मुनगटीवार यांच्या हस्ते स्थळ, विश्व् शांती बुद्ध विहार, गेट क्रमांक 5 मालवणी मालाड पश्चिम मुंबई या ठिकाणी, मालवणी नागरिक समिती च्या वतीने नागरी सत्कार समारंभ होणार असून या सोहळ्यास प्रामुख्याने, मालाड विधानसभा आमदार माजी मंत्री मा, अस्लम शेख, चारकोप विधानसभा आमदार माजी मंत्री मा,, योगेश सागर राजीव जैन,पोलीस अप्पर आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग तसेच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे परिमंडळ 11 बोरिवली, सहाय्यक पोलीस आयुक्त मा, शैलेंद्र धिवार यांची उपस्थिती राहणार आहे, या नागरिक सत्कार सोहळ्यास विभागातील सामाजिक संस्था संघटनानी सहभाग दर्शवावा असे मालवणी नागरिक सत्कार समिती ने आवाहन केले आहे,