Home यवतमाळ मुकूटबन येथे फिरते शौचालय उपलब्ध करून द्या – राहुल धांडेकर

मुकूटबन येथे फिरते शौचालय उपलब्ध करून द्या – राहुल धांडेकर

33

 

…..अन्यथा ग्रामपंचायतींना टाळे ठोकू

झरी जामणी : तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच नवीन नालीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे कित्येक दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याच प्रमाणे मुकूटबन येथील बसस्टँड चौकात असलेला मोठा प्रवासी निवारा, माजी सरपंच यांच्या काळकिर्दित अतिक्रमण जागेवर बांधकाम केलेले सार्वजनिक शौचालय, मुत्रिघर व भव्य प्रवेशद्वार सुध्दा बांधकाम विभागाकडून पाडण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची व जनतेची गैरसोय होत आहे. ही गैर सोय थांबविण्यासाठी मुकूटबन येथे बस स्टँड चौकातील जनतेसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा पुढील परिणामास मुकूटबन ग्रामपंचायतीला जबाबदार धरले जाईल आणि मुकूटबन ग्रामपंचायतीला टाळे ठोकले जाईल, असा इशारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल धांडेकर, तथा सदस्य व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेशरेड्डी येल्टीवार, मुकूटबन ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत बघेले यांचेतर्फे देण्यात आला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व १५ सदस्य असलेली मुकूटबनची ग्रामपंचायत आहे परंतु मागील चार वर्षात ग्रामपंचायत सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे विकासाच्या बाबतीत कोसो दूर आहे. मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे १०० फूट दुपदरी दुभाजक रस्त्याचे बांधकाम व रस्त्याला लागूनच नवीन नालीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे कित्येक दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याच प्रमाणे मुकूटबन येथील बसस्टँड चौकात असलेला मोठा प्रवासी निवारा, सार्वजनिक शौचालय, मुत्रिघर व भव्य प्रवेशद्वार सुध्दा अतिक्रमण जागेवर असल्याने बांधकाम विभागाकडून पाडण्यात आले. प्रवासी निवारा, सार्वजनिक शौचालय व मुत्रिघर पाडून ३ महिन्याचा कालावधी लोटला असून ग्रामपंचायत तर्फे जनहितार्थ प्रवासी निवारा, सार्वजनिक शौचालय व मुत्रिघरची कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. याकडे वारंवार मौखीक सांगून सुध्दा ग्रामपंचायतचे व लोक प्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिलांसाठी व शाळा, कॉलेज च्या मुलींसाठी शौचालय नसल्याने मोठी समस्या निर्माण झालेली दिसून येते. करिता या समस्येचा गांभीर्याने विचार करून झरी नगर पंचायत मध्ये उपलब्ध असलेले २ फिरते शौचालय तात्काळ उपलब्ध करून द्यावे. अन्यथा युवक काँग्रेस कडून मुकूटबन ग्रामपंचायत कार्यालयावर “ताला ठोको” आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल धांडेकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेशरेड्डी येल्टीवार, मुकूटबन ग्रामपंचायतचे सदस्य प्रशांत बघेले, गंगाधर आत्राम, शंकर आकुलवार, अभिमन्यु बेलखेडे, अनुप गेडाम, अरविंद खडसे, साई अपसवार, श्रीकांत पडलवार, राकेश गालेवार, अतुल पाटील, सतीश बद्दमवार यांनी तहसीलदार झरी जामणी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.