Home यवतमाळ पिक विमासाठी यवतमाळ शिवसेनेची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक..

पिक विमासाठी यवतमाळ शिवसेनेची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक..

44
विनोद पत्रे 
यवतमाळ – तीन लाख शेतकऱ्यांचा विमा अजून मिळालेला नाही, सरसकट शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा ही शिवसेनेची मागणी आहे त्याचा पाठपुरावा सतत शिवसेनेकडून होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा कृषी कार्यालयावर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांचे नेतृत्वात धडक देण्यात आली.
जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच माननीय आयुक्त यांनी पिक विमा कंपनीची अपील फेटाळल्यानंतर सुद्धा पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिलेली नाही त्याकरिता संबंधित पिक विमा कंपनीवर शेतकऱ्याची फसवणूक केल्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने जिल्हा कृषी अधीक्षकाकडे केली.
आयुक्ताकडे कंपनीची अपील फेटाळल्यानंतर पिक विमा कंपनीने मंत्रालयामध्ये सचिवाकडे अपील दाखल केली होती तिथे सुद्धा आयुक्तांचा निर्णय कायम ठेवण्यात आला असे जिल्हा कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले, संबंधित निर्णयाच्या प्रोसिडिंगची प्रत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पीक विम्याची रक्कम मिळेपर्यंत समोरील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा कृषी कार्यालयाकडून देण्यात आले. याप्रसंगी पवन जयस्वाल, महिला जिल्हा संघटक कल्पना दरवई, शहर प्रमुख चेतन सीरसाठ, अतुल गुल्हाने, विनोद पवार, जिल्हा सचिव तुषार देशमुख,भाई अमन,नितीन माकोडे ,जितेश नवाडे ,राजेश मांडवकर ,रवी पांडे, रंगराव काळे ,सचिन बारस्कर राजेंद्र कोहरे ,डॉ.गणेश नाईक ,राजू धोटे, चंद्रकांत उडाके शैलेश तांबे, अजय गाडगे पंकज देशमुख , संतोष चव्हाण,मतीन तमन्ना, शंकर देऊळकर, हरीश गुरुवाणी, संजय भोने, हेमंत उगले, इमरान पठाण विनोद काकडे ,संजय राठोड, दिनकर भवरे ,गणेश आगरे ,गजानन पाटील ,किशोर केवटे अक्षय ठाकरे राजू राऊत मंदाताई गुडदे ,नंदाताई देवगडे प्रतिभा हरण खेडे ,सुनिता टाके वैशाली कनाके, संगीता राऊत प्रभाकर बहादुरे, रामकृष्ण घरडे, क्षीतेश ठाकरे, तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी व नागरिक उपस्थित होते.