Home यवतमाळ यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनातील चॉईस पोस्टिंग सध्या चर्चेत..!

यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनातील चॉईस पोस्टिंग सध्या चर्चेत..!

52
ACB फास आवराल्यास  घबाड येणार उघडकीस…! 
सुशांत घाटे
यवतमाळ जिल्ह्यातील “अवैधमाळ”? मथळ्या खाली डेली पोस्टमार्टम ला वृत्त प्रकाशित होताच मोठा गदारोळ झाला आला आहे.
राज्यातील मुख्यता सर्वात मोठा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या प्रचलित करेक्ट कार्यक्रम करत कारवाई करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्लाजी यांना यवतमाळ जिल्ह्यातील बेकायदेशीर चालण्यात येणाऱ्या अवैध व्यवसायाचे वाटेकरी तथा पूर्णतः सांगारोप व्यवसायाला आश्रय देणाऱ्या,पोलीस स्टेशन ते पोलीस मुख्यालया पर्यंत बांधले गेलेले “आर्थिक” हितसंबंध तरतुदीचे धोरणाचे विकसित असलेल्या आर्थिक आराखडा सहित विश्लेषण करून अवैध धंद्याच्या यादीसहित माहिती देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे?
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अवैध धंदया्यांना चालना मिळत असल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात दिसत आहे?
पोलिसांची अलिखित दिली गेलेली परवानगी म्हणजे महिन्याकाठी आर्थिक ठरलेली,दरमहा लाखोच्या घरात ठरलेली लक्ष्मी प्रसन्न मुद्रा असल्याचे सध्या विदारक चित्र यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस विभागातील भ्रष्ट यंत्रनेला लागल्याने त्याचा मोठा कांगावा झाला आहे?
जिल्ह्यातील प्रमुख पोलीस स्टेशन ला चॉईस पोस्टिंग प्राप्त करण्याकरिता लाखो रुपयाची बोली सुद्धा लागल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे?यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात टॉप ची बोली अंतर्गत वरिष्ठ अधिकारी ला खुश करण्याकरिता वणी 50 लक्ष, पांढरकवडा 25-30 लक्ष, आर्णी 25 लक्ष, दारव्हा 15लक्ष ,घाटंजी 20 लक्ष,दिग्रस 15 लक्ष, बाबुळगाव 10लक्ष, उमरखेड 25 लक्ष, पुसद 15लक्ष अश्या जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन ला लक्ष वेध देत पोस्टिंग करण्यासाठी लाखोचा व्यवहार झाल्याचे पोलीस दलात दबक्या आवाजात जोरदार चर्चा रंगली आहे?
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानेच पोलीस निरीक्षक ची पोलीस स्टेशन ला पात्रते नुसार वर्णी लावण्यात येते? मात्र यवतमाळ जिल्ह्यात पात्रतेची कैची ला दूर सारथ मार्जितले आर्थिक हितसंबंध साधत वर्णी लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सध्या होत आहे?
पोलीस अधीक्षक यांची हॉट ब्रांच म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेला तर नंबर एक ची पसंद असल्याचे विश्वसनीय सूत्राने माहिती दिली आहे. या ठिकाणी वर्णी लावण्या साठी तर मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची ही जोरदार चर्चा रंगली आहे,  चॉईस पोस्टिंग घेऊन आर्थिक व्यवहार साधणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टिंग म्हणजे च अवैध धंदया्यांना चालना देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून “अलिखित” दिलेला परवाना म्हणायचा का हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्यावर आरोप सुद्धा आता करण्यात येत आहे? या सर्व बाबींची लाचलूचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी केल्यास पूर्ण घबाड च बाहेर येऊ शकते? आर्थिक धोरणाचे कोट्यवधी रुपये कुठून कुठे पाण्या सारखे मुरले आणि कुठल्या अधिकाऱ्याची कीती प्रॉपर्टी याचा लेखा जोखा च बाहेर येऊ शकतो. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या सानिध्यात असलेले ते यवतमाळ जिल्ह्यातील अधिकारी कौन याचा लवकरच सौक्षमौक्ष लागेलच, पारदर्शक आणि नीट अँड क्लीन कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्लाजी यवतमाळ जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला लागलेली कीड लवकरच संपुष्टात आणेल हा जनसामान्य नागरिकांना विश्वास आहे.