मुंबई, (प्रतिनिधी) – पवई पासपोली गावातील निसर्ग सौन्दर्याने नंटलेल्या विहार लेक परिसरात विकासक प्रशांत शर्मा यांचे बेकायदेशीर खोदकाम बंद तर अवैद्य हॉटेल्स तसेच अनधिकृत स्टुडिओ चे निष्कासन होणार की नाही? असा प्रश्न विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमान्ना केला आहे.
देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियान चे राष्ट्रीय आयोजक समाजभूषण, पॅन्थर राजन माकणीकर मागील काही महिन्या पासून पवई पासपोली गावातील विहार लेक परिसरात बेकायदेशीर टुरिस्ट नावाचे चादर पलटी हॉटेल उभारले असून डॉ. माकणीकर यांच्या तक्रारी नंतर हॉटेल मालकाने मा. न्यायालयात धाव घेतली असल्याचे वृत्त आहे.
सदरचे हॉटेल पूर्णपने अनधिकृत असून प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे असे कळते. मात्र लवकरच निष्कसन होणार यात वाद नाही, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याच परिसरात अन्य चादर पलटी हॉटेल्स पण आहेत, या सर्व हॉटेल्स ची कागदपत्र व सर्व परवानग्यांची तपासणी करने महत्वाचे आहे. अशी माहिती डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसारमध्यमान्ना दिली.
याच ठिकाणी काही अंतरावर टुरिस्ट हॉटेलच्या मागे चित्रपट चित्रीकरण करण्याचे अनधिकृत स्टुडिओ आहे. या स्टुडिओ चा मालक अंदाजे 4 ते 5 लाख रु प्रति माह स्टुडिओ भाडेतत्वावर देऊन अनाधिकृत स्टुडिओ च्या माध्यमातून कमावत आहे आणि शासन प्रसाशन मूग गिळून गप्प आहे. याचे कारण काय असावे असा प्रश्न लोकांत निर्माण झाला आहे.
याच एतिहासिक परिसरात विकासक प्रशान्त शर्मा आपल्या राजकीय ओळखीचा फायदा घेऊन सबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोदकाम चालू केले आहे, हे खोदकाम करून ते या ठिकाणी मोठमोठे टॉवर उभे करणार आहेत, शिवाय ठीकानी त्यांनी वृक्ष तोड केली आहे, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुसरी झाडे कुठे लावली आहेत? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
3000 च्या वर ट्रक भरून खोदलेली माती रॉयल्टी न भरता दुसरीकडे वाहिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मार्फतीने मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या फोनवर बंद झालेली कामे पुरवत चालू करण्यात आल्याची चर्चा परिसरात चालू आहे. याचे काम कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात निसर्गप्रेमी असल्याचे वृत्त आहे.
विहार लेक परिसरात यांनी कशी परवानगी मिळवली कोणत्या दस्तायेवजाच्या आधारे कोणती परवानगी मिळवली आहे, मिळवलेल्या सर्वच परवानग्यांची फेर तपासणी व्हावी अशी मागणी स्थानिक जनतेकडून होत आहे.
अंडर वर्ल्ड डॉन सुभाष सिंग ठाकूर साठी राजकारण, शिक्षन व बांधकाम क्षेत्र चालवून कोणता घाट प्रशांत शर्मा घालत आहेत असा सवाल जनतेतून येत आहे. विकासक शर्मा यांचे सर्व बँक खाती व फोन कॉल लॉग्स तपासले तर अंदर की बात क्या हैं? हे समजून येईल असे जनते कडून बोलले जातं आहे.