यवतमाळ – पांढरकवडा येथील दानशुर प्रसिद्ध व्हिसल ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरेले यांची पत्नी नीताताई मडावी (बोरेले) यांनी एकशे सत्तर मूल आणि मूली यांना एक ते सातव्या वर्गातील गरजुवंत विद्यार्थ्यांना नोट बुकांचा संच वाटप करण्यात आला.
दिनांक 23/7/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मराठी शाळा न.प. पांढरकवडा येथील मुख्याध्यापक सुनील गंगशेट्टीवार, शिक्षिका राधिका कोंडपालकुलवार यांनी निताताई मडावी (बोरेले) सर्वम रजनीकांत बोरेले व रजनीकांत डालूरामजी बोरेले यांना भेट वस्तु देवून स्वागत केले तदनंतर नीताताई आनंदराव मडावी (बोरेले) व रजनीकांत बोरेले यांच्या यांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना नोट बुक संच वाटप केले आहे.
ऐकून आठशे नोट बुक सर्वम बोरेले यांच्या खाऊँच्या पैसेतुन अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना देवून सामाजिक उपक्रम केला आहे.
यावेळी निता मडावी (बोरेले) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले पुढे रजनीकांत बोरेले यांनी मार्गदर्शन केले
रजनीकांत बोरेले परीवार हे नेहमीच गरजुवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्यांचे शिक्षणाचे आर्थिक भार उचलने, साइकल देणे,पुरग्रस्त यांना साहित्य देणे, वृद्ध आश्रम ला सुविधा आणि आर्थिक मदत देणे, रुग्णग्रस्त यांना औषध उपचार करीता आर्थिक मदत देने,रुग्ण वाहिका देणे,अनाथ आणि गरीब मुलींच्या लग्न करीता आर्थिक व धान्य मदत देणे,सनसुदी निमित्याने गरीब महिलांना लुगड,साड़ी वाटप करणे, गरीब विद्यार्थिनी हिला आर्थिक बचत ठेव देणे,सैनिक कल्याण निधि या शिवाय धार्मिक कार्यास आर्थिक मदत देणे, मरण व तेरवी अश्या कार्यास धान्य आणि आर्थिक मदत देणे अश्या अनेक मदत शैक्षणिक, धार्मिक,सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान करीत असतात. त्यामुळे रजनीकांत बोरेले हे “दांनशुर” दिलदार मानुस म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. निता मडावी (बोरेले) रजनीकांत बोरेले, आणि सर्वम रजनीकांत बोरेले यांच्या कार्य मुळे समाजाला प्रेरणा मिळत असून त्यांनी केलेल्या कार्याची समाजात कौतुक केली जात असून सुनील गंगशेट्टीवार शिक्षिका राधिका कोंडपालकुलवार,शिक्षक काकड़े,निवृत शिक्षक आरीफ सर यांनी आभार मानले आहे.तर संतोष गंगशेट्टीवार यांनी रजनीकांत बोरेले यांच्या दांनशुर कार्य विषयी उत्कृष्ट मनोगत व्यक्त करुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
Home यवतमाळ एकशे सत्तर” विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सर्वम बोरेले यांच्या खाऊचे पैशातुन केले...