Home मुंबई महिलांशी ऑनलाइन मैत्री करून 9 वर्षात 25 च्या वर लग्न करणारा अडकला...

महिलांशी ऑनलाइन मैत्री करून 9 वर्षात 25 च्या वर लग्न करणारा अडकला पोलिसांच्या जाळ्यात ,

82

 

 

अमीन शाह

महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये 25 च्या वर विवाह करून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा येथील एका महिलेने याबाबत तक्रार केली होती. तिच्याशी लग्न केल्यानंतर त्या व्यक्तीने कशी फसवणूक केली हे तिने सांगितले.

देशभरातील महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यात लग्न करून अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा येथील एका महिलेने त्याची तक्रार केली होती. या महिलेसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या वागणुकीवर तिला संशय आला. त्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जी माहिती मिळाली ती धक्कादायक होती. सुमारे 25 विधवा महिलांसोबत लग्न करून त्याने त्यांची फसवणूक केल्याचे या तपासात उघड झाले. पालघर पोलिसांनी त्या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत. फिरोज नियाज शेख असे त्या भामट्याचे नाव आहे.

फिरोज याने मॅट्रिमोनियल साइटवर मैत्री केली. नंतर तिच्याशी लग्न केले. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान फिरोजला तिने 6.5 लाख रुपये दिले. मौल्यवान वस्तू दिल्या. पण आपली फसवणूक होत आहे याची आपणास कल्पना नव्हती. मात्र, यानंतर तो आपल्यासोबत वाईट वागू लागला. त्याचा फोन तपासला असता धक्कादायक गोष्टी समोर आल्या, असा आरोप या महिलेने केला.
पालघर पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रारीच्या आधारे फिरोज शेख याला अटक केली. पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय सिंह भागल यांनी या प्रकरणासंदर्भात आयपीसीच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे अशी माहिती दिली. पोलिसांनी शेखकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, चेकबुक आणि दागिन्यांसह अनेक वस्तू हस्तगत केल्या आहेत.

पोलीस तपासामध्ये फिरोज शेख याने महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातसह इतर अनेक राज्यात लग्न करून सुमारे 25 महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले. फिरोज विवाह स्थळांवर विशेषत: विधवा महिलांशी मैत्री करायचा. त्यांच्या विश्वास संपादन करून तो त्यांच्याशी लग्न करत असे. लग्न झाल्यानंतर तो त्यांच्याकडून पैसे आणि दागिने मिळवायचा. 2015 पासून तो अशा प्रकारे महिलांची फसवणूक करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.