Home बुलडाणा बापरे बाप…तब्बल ७ महिने उलटले मात्र अद्यापही खुनाचा व कोणाचाच तपास लागला...

बापरे बाप…तब्बल ७ महिने उलटले मात्र अद्यापही खुनाचा व कोणाचाच तपास लागला नाही

23

पोलीस प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह…

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली ते देऊळगांव राजा हायवे रोडवर असलेल्या राजवाडा हॉटेलच्या पाठीमागील फॉरेस्ट जंगलात गट नंबर ५४१ मध्ये एका अज्ञात अनोळखी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीला अर्धवट जाळून टाकले होते. या घटनेला सात महिन्याचा कालावधी आटोपला तरी सुध्दा ही अनोलखी महिला कोण आणि तिचे मारेकरी कोण याचा अद्यापही तपास लागला नसल्याने पोलीस प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दे. राजा ते चिखली हायवे रोडवरील अंचरवाडी ते मेरा खुर्द मधोमध रोडवर बंद अवस्थेत एक राजवाडा नावाचा ढाबा आहे. या धाब्याचा आजूबाजूला फॉरेस्टचे घनदाट जंगल आहे. या धाब्याच्या पाठीमागील जागेवर एका २० ते २५ वयाच्या महिलेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी तीचा खून करून अर्धवट जाळून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सदर माहिती वरुण अंढेरा पोलीस कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व एलसीबी पथक घटनास्थळी जावून त्यांनी पंचनामा केला असता सदर महिलेच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस काहीतरी मारुन, जखमी करुन, तिला जिवाने ठार मारले.
तसेच तिची ओळख पटू नये म्हणून, तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्धवट जाळले होते. तसेच तीच्या हातावर लव्ह (दिल) चिन्ह गोंदलेले असून त्यावर एस के (sk) असे इग्रजी मध्ये गोंदलेले होते, हातामध्ये पंचरंगी धागा बांधलेला आढळून आला होता. अशा घटनेवरून अंढेरा पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी अनोळखी महिलेच्या खून प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३०२, २०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या घटनेला चक्क सात महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी सुध्दा अद्यापर्यंत पोलीस यंत्रनेला अनोलखी महिला कोण, तिचे मारेकरी कोण याचा तपास लागला नाही एकीकडे पोलीस प्रशासन लहान लहान गुन्ह्याची प्रसिद्धी करत आहे आणि इकडे मोठा गुन्हा घडूनही अनोळखी महिलेचे मारेकरी राजरोसपणे मोकळे फिरत आहेत. या अगोदरही चोऱ्या, दरोडे, ड, खून अशा घटनेचा तपास गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अशा पोलीस यंत्रणेच्या तपासावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे…एवढं मात्र खरे