Home बुलडाणा माँ जिजाऊ साहेब राजवाड्या समोरील मोठ मोठी झाडे पुरातत्व विभागाने तोडली ,

माँ जिजाऊ साहेब राजवाड्या समोरील मोठ मोठी झाडे पुरातत्व विभागाने तोडली ,

61

 

 

परिसर केलं भकास ,

अमीन शाह

आज सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळा समोर डोलाने उभ्या असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने काही नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला. एका वृत पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमी नुसार राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोरील उंच झाडे तोडण्याची मागणी काही समाजसेवींनी केली होती.यात त्यांचे म्हणणे होते की महामार्गावरून राजवाडा दिसत नाही. त्यामुळे ही झाडे तोडण्यात यावी अन्यथा तिरव आंदोलन छेडण्यात येईल असेही म्हटले होते

सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळा समोर गेल्या अनेक वर्षा पासून ही झाडे अस्तित्वात उभी होती. या झाडांमुळे राजवाड्याची शान सौंदर्य दिसत होते. पुरातत्व विभागाने मात्र आज या झाडांची कत्तल केल्याचे आज दिसून आले.

ऐतिहासिक राजवाड्या समोरील उंच उंच झाडांमुळे लांबून राजवाड्याचा पार्श्वभाग दिसत नसल्याची ओरड काही सामाजिक कार्यकर्त्यांची होती.

ऐतिहासिक राजवाड्या समोरील उंच उंच झाडांमुळे लांबून राजवाड्याचा पार्श्वभाग दिसत नसल्याची ओरड होती. सदर उंच झाडे न तोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील राजू मेहत्रे घनश्याम केळकर, सुनील आढाव, रामेश्वर मेहत्रे, उमेश खरात यांनी दिला होता. दरम्यान आज पुरातत्त्व विभागाने या झाडांच्या मुळावर घाव घातला. एकीकडे झाडे लावण्यासाठी लाखोंचा खर्च केला जातो. दुसरीकडे पुरातत्त्व विभागाने ही मोठ मोठी झाडे तोडल्यामुळे सिंदखेडराजा येथील नागरिकांनी व निसर्गप्रेमींनी याचा निषेध व्यक्त केला आहे.

वृक्ष तोडीचा तिरव निषेध ,

आज अचानक वृक्षतोड झाल्याने पर्यावरण प्रेमी अँड , संदीप मेहेत्रे, बाळू शेवाळे, मंगेश खुरपे, नीलेश ठाकरे, संजू मेहेत्रे, कौतुक ठाकरे, ज्ञानेश्वर खांडेभराड, शहाजी चौधरी, दिलीप काळे, दिलीप चौधरी, रामेश्वर घाटोळकर, नागेश कुरंगळ यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी राजवाड्यासमोर जमा होऊन पुरातत्त्व विभागाचा निषेध केला. परिसरातील बागेत युवकांच्या व्यायाम करण्याचे साहित्य होते. त्याचेही नुकसान केले गेले आहे. खरंतर ही बाग नगरपालिका हद्दीत असून, राजवाडासमोर बाग असल्यानेच शोभा दिसत होती.