Home बुलडाणा त्या शिक्षका वरील गुन्हा सर्वोच्च न्यायालयात ही रद्दच ,

त्या शिक्षका वरील गुन्हा सर्वोच्च न्यायालयात ही रद्दच ,

27

 

अमीन शाह

बुलडाणा ,

खामगाव तालुक्यातील एका शिक्षकावरील गुन्हा रद्द करण्याचा उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. खामगाव शहरातील गजानन कॉलनीतील शिक्षक श्रीकांत वानखडे नामक शिक्षकावर दाखल झालेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एप्रिल २०२२ मध्ये चाकू दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा एका शिक्षिकेने खामगाव शहर पोलिस ठाण्यात नोंदविला होता. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.