Home बुलडाणा शेतात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून लुटणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

शेतात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून लुटणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

48

 

 

अमीन शाह

बुलडाणा ,

पती पत्नी शेतातील गोठ्यात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी संगनमत करून जबरी चोरी करण्याच्या उद्वेशाने पती पत्नीस लोखंडी रॉड चा धाक धाकून जबर मारहाण केली होती आणि अंगावरील दागिणे लुटून पसार झाले होते. ही घटना अंचरवाडी वसंतनगर बंजारा तांड्यावर १६ जुलै रोजीच्या रात्रीला १२ वाजेच्या सूमारास घडली होती. या प्रकरणात अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपींचा शोध घेतला जात होता या प्रकरणी पोलिसांनी आज चार आरोपी पैकी एकास पकडले .

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंचरवाडी वसंतनगर बंजारा तांड्याच्या शेजारी शेतात राहत असलेले सौ जिजाबाई विष्णू राठोड वय ६० वर्ष व त्यांचे पती विष्णू राठोड हे दोघे पती पत्नी गोठ्यात झोपलेले असतांना रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि पती पत्नीला लोखंडी रॉडचा धाक धाकून त्यांना जबर मारहाण करीत महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दाग दागिने चोरून नेले अशी तक्रार सौ जिजाबाई विष्णू राठोड वय ६० वर्ष यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली होती.

दिलेल्या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी अज्ञात चार आरोपी विरुध्द कलम ३०९,(६),३ (५) बिएन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ठाणेदार विकास पाटील आणि दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी गुपत माहिती वरुण तपास केला. एक संशयित म्हणून पैठण येथे जावून एक आरोपी ताब्यात घेतल. परंतु ताब्यात घेतलेल्या आरोपीने मुख्य आरोपी हा अंढेरा येथील पारधी वाड्यातील आहे, असे सांगताच आरोपी कुंडलिक शंकर काळे वय ३० याला राहत्या घरातून अटक केली त्याची कसून चौकशी केली असता त्याने आनखी तीन जण चोरी करण्यासाठी सोबत होते असे सागितले. त्यामुळे लवकरच फरार असलेले तीन आरोपीला अटक करण्यात येईल असे ठाणेदार विकास पाटील यांनी सांगितले.