Home नांदेड धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्कूल किट...

धर्माबाद येथे पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम संपन्न

38

विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने परिश्रम केल्यास यशाला सहज गवसणी घालता येते- कवळे गुरूजी

नांदेड – पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने आयोजीत भव्य जिल्हा स्तरीय गुरू गौरव गुणवंत विद्यार्थी व स्कूल कीट वाटप सोहळा माहेश्वरी भवन धर्माबाद या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगांव मतदारसंघाचे शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी हे होते.. उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की ,शिक्षण शेत्रात प्रगती करून उच्च शिखरावर पोहचन्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते.यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासोबत विद्यार्थांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असल्यास याशाला सहज गवसणी घालता येते.पत्रकार संरक्षण समिति ने समाजिक जाणीव लक्षात घेता विद्यार्थांना प्रेरणा व प्रोत्साहित करणारा घेतलेला कार्यक्रम विद्यार्थांच्या भावी वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणदायी ठरेल असे मत मार्गदर्शन करताना शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी प्रतिपादन केले.
पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने सलग १३ वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,गुरू गौरव, पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, आदर्श उद्योजक पुरस्कार,आदर्श शेतकरी पुरस्कार, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान कऱण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव कवळे गुरूजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून , जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव शशिकांत गाडे, आशिष कुष्णुरकर, महेश शिंदे, नांदेड, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव बी. डी.,केंद्र प्रमुख बाळापूर कमलाकर ऐन. जी, शिंपाळे एस. ए, बाने एस. एन, गोणारकर पी. आई, गट साधन केंद्र बोपटे मनोहर, वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार जे. के जोंधळे, पत्रकार संजय कदम, गणपत कात्रे, आर. जे. गायकवाड, राजू शिरामाने, एम. मुरलीधर, दीपक पाटील चोळखेकर, अशोक वडजे, पी. जी.कोटूरवार, नागनाथ माळगे, पोतन्ना लखमावाड, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र आणि स्मुतीचिन्ह देउन गौरव करण्यात आला. २०२४ या वर्षाचा शोध पत्रकारिता पुरस्कार चंद्रभीम हौजेकर यांना देऊन गौरविण्यात आले.तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार हा सौ. लता राजू चौकेवार यांना देउन सन्मान करण्यात आला. यासोबतच आदर्श प्रशासक पुरस्कार म्हणून राहुल ममदापूरकर, यांना देण्यात आला. यावेळी जे. के.जोंधळे, बसापुरे सर, जाधव बी डी, संजय कदम, सौ.संगीता पाटील,औसाजी जाधव, टी.जी तुरे सर,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम राबवून गरजू गरीब होतकरू विद्यार्थ्यांना २०० स्कूल किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर शेषराव येलमे यांनी केले. सूत्रसंचलन पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांनी केले तर म. मुबशीर यांनी संपूर्ण उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संरक्षण समिति चे पदाधिकारी कृष्णा जाजेवार, संजय झगडे,गजानन मुडेवार, गणेश पंदुलवार, फिरोज कुरेशी, लालू उशलवार, दत्ता सज्जन, आदींनी परिश्रम घेतले.

चौकट
——————————————-
पत्रकार संरक्षण समितीचा सामाजिक उपक्रम अभिमानास्पद -महेंद्र गायकवाड

पत्रकार संरक्षण समिती हि संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय, हक्का लढा देत असून सामाजिक उपक्रमात हि पत्रकार संरक्षण समिती अग्रेसर आहे. धर्माबाद तालुका पत्रकार संरक्षण समितीचा हा सामाजिक उपक्रम अभिमानास्पद आहे.असे मत यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमासमोर व्यक्त केले.